24 November 2020

News Flash

लस्ट स्टोरीजमधील ‘व्हायब्रेटर सीन’वर कियाराने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..

तिने एका चॅट शोमध्ये हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटातही अतिशय बोल्ड सीन दिले आहेत. या सीनमुळे कियारा चर्चेत होती. चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रशंसा देखील करण्यात आली होती. आता या चित्रपटातील व्हायब्रेटर सीनवर कियाराने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच कियाराने नेहा धूपियाचा टॉक शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिला लस्ट स्टोरीज या चित्रपटाशी संबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी तिने ‘व्हायब्रेटर सीन’चा देखील खुलासा केला. ‘करण जोहर आम्हाला सर्वांना सांगायचा की आम्ही काय करायचे आहे. मला ते आवडायचे. आम्ही सर्व होमवर्क सेटवरच करायचो. पण चित्रपटात मला एक बोल्ड सीन द्यायचा होता. ज्यामध्ये व्हायब्रेटर होते आणि मला व्हायब्रेटर विषयी काहीही माहिती नव्हते. मी नेटवर सर्च करुन त्याविषयी माहिती मिळवली’ असे कियारा म्हणाली.

पुढे तिने म्हटले की, ‘जेव्हा मला हा सीन करण्यास सांगितला तेव्हा एक, दोन, तीन अॅक्शन असे म्हटले आणि मी अभिनय केला. मी सीन चांगला शूट करण्यासाठी प्रयत्न केला. या सीनसाठी आम्ही जास्त टेक घेतले नाहीत. तसेच मी या सीनविषय फार विचार केला नाही. हा सीन शूट करणं म्हणजे फेक योगा ब्रीदिंग करण्यासारखं होतं.’

लस्ट स्टोरीज हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कियारा अडवाणी, राधिका आपटे, आकाश ठोसर, भूमि पेडणेकर, विकी कौशल, नेहा धूपिया हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी हा चित्रपट चर्चेत होता. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 10:03 am

Web Title: kiara advani reveal about controversial vibrator scene in lust stories avb 95
Next Stories
1 Videos : ‘मिले हो तुम हमको..’; स्वत:च्या लग्नात नेहा कक्करने गायलं गाणं, केला अफलातून डान्स
2 अजय विसरला होता लग्नाची तारीख, अशी होती काजोलची प्रतिक्रिया
3 नवमाध्यमांच्या लाटेवरचे नवे चेहरे
Just Now!
X