‘कबीर सिंग’ फेम कियारा आडवाणी सध्या बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. येत्या काळात कियारा मल्टी स्टारर चित्रपट ‘गुड न्युज’मध्ये झळकणार आहे. परंतु सध्या ती आगामी चित्रपटापेक्षा तिच्या नावामुळेच जास्त चर्चेत आहे. कियाराचे खरे नाव ‘आलिया आडवाणी’ असे आहे. मात्र बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमुळे तिला आपले नाव बदलावे लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियाराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या नावाची खरी कहाणी सांगितली. सलमान खानने कियाराला बॉलिवूडमध्ये दोन आलिया नको असे सांगत तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. सलमान म्हणाला, बॉलिवूडमध्ये आधीच एक आलिया भट्ट नावाची अभिनेत्री आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकाच नावाच्या दोन आलिया असतील तर गोंधळ होईल. सलमानचा हा सल्ला तिने मानत स्वत:चे नाव बदलले.

 

View this post on Instagram

 

Layering up this winter ❄ with @labelritukumar #LabelRituKumar #LabelRituKumarAW19 #JustDanceWithLABEL #structuredpastoral

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियाराने आपले नाव आता ‘कियारा आलिया आडवाणी’ असे ठेवले आहे. “आधार कार्ड व पासपोर्टवर माझे नाव आलिया आडवणी असे आहे. मी अद्याप कुठल्याही सरकारी डॉक्युमेंटवरील नाव बदलले नाही. त्यामुळे परदेशात गेल्यावर केवळ नावामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच सरकारी कामातही अडचणी येतात. त्यामुळे लवकरच मी पासपोर्ट व आधार कार्डवरील नाव बदलणार आहे.” कियाराने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले.