News Flash

डाएट विसरुन कियाराने केली समोसा पार्टी; पाहा व्हिडीओ

...म्हणून कियाराने केली खास समोसा पार्टी

बॉलिवूड कलाकारमंडळी त्यांच्या हेल्थ आणि डाएट याच्याविषयी कायमच सतर्क असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकदा ही कलाकार मंडळी जीम, योगा यांचा आधार घेत स्वत:ला फीट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, अभिनेत्री कियारा आडवाणीने डाएटला छोट्यासा ब्रेक देत चक्क समोसा पार्टी केल्याचं पाहायला मिळालं.

‘फिल्मफेअर’ने कियाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कियारा समोसा पार्टी करताना दिसून येत आहे. अलिकडेच कियाराचा ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी कियारा चित्रपटगृहात पोहोचली होती. येथेच कियाराने समोसा पार्टी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)


दरम्यान, कियाराच्या या व्हिडीओमध्ये मल्लिका दुआदेखील असल्याचं दिसून येत आहे. इंदू की जवानी या चित्रपटाचं दिग्दर्शन अबीर सेनगुप्ता यांनी केलं आहे. या चित्रपटानंतर कियारा लवकरच शेरशाह, भूलभुलैय्या २ या चित्रपटात झळकणार आहे. अलिकडेच ती लक्ष्मी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 4:28 pm

Web Title: kiara advani samosa party during indoo ki jawani show in cinema hall ssj 93
Next Stories
1 ‘विकासने मला चुकीच्या पद्धतीने…’, अर्शी खानने विकास गुप्तावर केला आरोप
2 अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचा वाद मिटला; मेघराज राजेभोसले यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड
3 जेम्स बॉण्डच्या पहिल्या पिस्तुलाचा झाला लिलाव; किंमत ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
Just Now!
X