13 August 2020

News Flash

पहिल्या जॉबमध्ये कियाराला बदलावे लागले लहान मुलांचे डायपर्स

कियारा करायची या ठिकाणी काम

अभिनेत्री कियारा अडवाणी म्हटल्यावर अनेकांना कबीर सिंग,एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी हे चित्रपट आठवतात. फगली या चित्रपटातून कियाराने कलाविश्वात पदार्पण केलं. पहिला चित्रपट अपयशी ठरला.मात्र त्यानंतरचे तिचे चित्रपट सुपरहिट ठरले. सध्या यशाची चव चाखणारी कियारा कलाविश्वात येण्यापूर्वी जे काम करायची ते कदाचित कोणालाही माहित नसेल. कियारा लवकरच गुड न्यूज या चित्रपटात झळकणार असून सध्या ती प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी कोणतं काम करायची हे सांगितलं.

‘बॉम्बे टाइम्स’नुसार, “कलाविश्वात येण्यापूर्वी कियारा लहान मुलांना सांभाळण्याचं काम करायची. माझी आई एक प्री -स्कूल सांभाळायची. त्यामुळे मीदेखील तिला तेथे मदत करायची आणि हीच माझी पहिली नोकरी होती. सकाळी सात वाजता मी प्री-स्कूलमध्ये जायचे आणि तेथील लहान मुलांना सांभाळायचे”, असं कियाराने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

पुढे ती म्हणते, “मला लहान मुलांना सांभाळायची सगळी कामं येतात. अगदी कविता म्हणण्यापासून ते त्यांचं डायपर्स बदलण्यापर्यंत सारं काही मला येतं. मला लहान मुले प्रचंड आवडतात”.

दरम्यान, कियारा ‘गुड न्यूज’ या आगामी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट २७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहने केली आहे. यात अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय कियारा अक्षय कुमार सोबत ‘लक्ष्मी बॉम्ब’ या सिनेमात दिसणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 1:10 pm

Web Title: kiara advani says she worked as babysitter before entry in bollywood ssj 93
Next Stories
1 पुनम पांडेला अ‍ॅसिड हल्ला आणि बलात्काराची धमकी
2 या व्यक्तीच्या निधनामुळे अनुष्का भावूक, शेअर केली पोस्ट
3 ज्याचे सिनेमे करतात १००० कोटींची कमाई, तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे सातवी नापास
Just Now!
X