News Flash

रॅप म्हणत कियाराने कापले केस, पाहा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये कियाराने तिच्या आयुष्यावर रॅप करत स्वत:चे केस कापले असल्याचे समोर आले आहे

कियारा अडवाणी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी रॅपच्या प्रेमात पडली आहे. कियाराने रॅप सॉंग म्हणतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील घटनांवर रॅप तयार केल्याचे दिसत आहे. तसेच रॅपच्या शेवटी कियाराने असे काही केले जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आपल्या भावना व्यक्त करत असतात. तसेच त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे याची देखील माहिती देत असतात. कियाराने देखील असेच काहीसे केले आहे परंतु एकदम हटके अंदाजात. ‘मला माझे केस फार आवडतात. कोणाला आवडत नाहीत. परंतु चित्रीकरण करताना वेगवेगळ्या लूकसाठी केसांवर अनेक रासायनिक उत्पादकांचा वापर केला जातो आणि माझ्याकडे केसांची देखभाल करण्यासाठी वेळ नाही. जरी माझी विचारसरणी आधुनिक असली तरी काही बाबतीत मी परंपरांचे पालन करते. खासकरुन सुंदर दिसण्यासाठी’ असे कियारा म्हणाली.

व्हिडिओमध्ये कियाराने तिच्या आयुष्यावर रॅप करत स्वत:चे केस कापले असल्याचे पाहायला मिळाला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच कियाराने असे का केले असेल असा मोठा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

कियारा लवकरच राघव लॉरेन्स यांचा दक्षिणात्य चित्रपट ‘कंचना’च्या बॉलिवूड रिमेक दिसणार आहे. या चित्रपटात कियारासह अक्षय कुमार आणि आर माधवन दिसणार असल्याची चर्चा आहे. ‘कंचना’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला या महिन्यात सुरुवात होणार असून २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच या रिमेकचे दिग्दर्शन खुद्द राघव करणार की बॉलिवूड दिग्दर्शक करणार हे अद्याप समोर आले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 6:31 pm

Web Title: kiara advani shared a video in which she is cutting her hair
Next Stories
1 #MeToo वरील आरोपांवर बोलताना अली जफरला कोसळलं रडू
2 सलमान-फरहान करणार एकत्र काम?
3 १९ व्या ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्काराची नामांकनं जाहीर
Just Now!
X