News Flash

‘लिज्जत पापड’ची यशोगाथा रुपेरी पडद्यावर; आशुतोष गोवारीकरांच्या चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची वर्णी

'कर्रम कुर्रम' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ असे नावाजलेले चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. बॉलिवूडमधील आघाडीच्या प्रथितयश दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवणारे आशुतोष लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा हा आगामी चित्रपट लिज्जत पापड या प्रसिद्ध ब्रॅण्डच्या यशोगाथेवर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीची वर्णी लागल्याचं सांगण्यात येत आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, आशुतोष गोवारीकर कायमच त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून एक नवा विषय हाताळण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे लवकरच त्यांचा ‘कर्रम कुर्रम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

लिज्जत पापड या उद्योगसमुहाची सुरुवात एका सामान्य गृहिणीने केली आणि पाहता पाहता तिच्या या व्यवसायाचा वटवृक्ष झाला. केवळ सहा गृहिणींच्या मदतीने हा व्यवसाय सुरु करण्यात आला होता. त्यामुळेच याविषयावर आधारित चित्रपट करण्याचा निर्णय आशुतोष गोवारीकर यांनी घेतला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ग्लेन बरेटो आणि अंकुश मोहला करणार असून सुनिता गोवारीकर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

दरम्यान, ‘कर्रम कुर्रम’ या चित्रपटाची कथा पूर्ण झाली असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्या कियारा ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र, हे चित्रीकरण सुरु करण्यापूर्वी तिने ‘कर्रम कुर्रम’ हा आगामी चित्रपट साइन केला आहे. तसंच तिचा आगामी ‘इंदू की जवानी’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 12:58 pm

Web Title: kiara advani signs ashutosh gowariker new film karram kuraam based on lijjat papad success story ssj 93
Next Stories
1 “तुम्हाला जळवण्यासाठी ही पोस्ट करतोय”; अभिनेत्यानं उडवली कंगनाची खिल्ली
2 “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा
3 #DiljitVsKangana: ‘कंगना को दिलजीत पेल रहा है’ विरुद्ध ‘कंगना रानौत शेरनी है’… मिम्समधून धम्माल टोलवाटोलवी
Just Now!
X