03 June 2020

News Flash

कियारा आडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; फोटो व्हायरल

डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी केले टॉपलेस फोटोशूट

कियारा आडवाणी

बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं नवीन सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करत असतो. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार खास डब्बूसाठी फोटोशूट करुन घेतात. नुकतंच डब्बू रत्नानीने त्यांचं 2020 या नवीन वर्षातलं कॅलेंडर प्रकाशित केलं. या कॅलेंडरमध्ये बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचा समावेश असून त्यांनी या कॅलेंडरसाठी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या कॅलेंडरमधील अभिनेत्री कियारा आडवाणीच्या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या कॅलेंडरसाठी कियाराने टॉपलेस फोटोशूट केलं आहे.

‘कबीर सिंग’ आणि ‘गुड न्यूज’ या चित्रपटांमुळे लोकप्रिय ठरत असलेल्या कियाराने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं आहे. हा फोटो कियाराने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो कियाराने शेअर केल्यापासून तुफान व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A leaf out of #DabbooRatnaniCalendar! @dabbooratnani @manishadratnani

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

दरम्यान, कियारा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अलिकडेच तिची मुख्य भूमिका असलेल्या ‘गिल्टी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये कियारा नव्या रुपात दिसून येत आहे. विशेष म्हणजे कियारा पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात दिसून येत आहे. या चित्रपटात ती नानकी ही भूमिका साकारत असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 10:22 am

Web Title: kiara advani topless photoshoot viral on social media ssj 93
Next Stories
1 रोमी भाटिया की दीपिका? ’83’ मधील हा फोटो पाहून पडेल प्रश्न
2 ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा ‘मराठा लाईट इन्फण्ट्री’मध्ये संग्रह
3 ‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये वसई-भाईंदरचे नृत्यपथक अव्वल
Just Now!
X