News Flash

जाणून घ्या कियाराच्या कपड्यांची किंमत, ऐकून व्हाल थक्क!

कियाराने अलिकडेच इन्स्टाग्रमावर हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेले काही फोटो शेअर केले.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी कियारा तिच्या फोटोमुळे नव्हे, तर तिने परिधान केलेल्या महागड्या कपड्यांमुळे चर्चेत आहे.

कियाराने अलिकडेच इन्स्टाग्रमावर हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेले काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. मात्र यावेळी तिच्या सौंदर्याची नव्हे तर तिने परिधान केलेल्या आकर्षक कपड्यांचीच जास्त चर्चा आहे. तिच्या या हिरव्या रंगाच्या ड्रेसची किंमत तब्बल ३१ हजार रुपये इतकी आहे. काही तासांपूर्वी पोस्ट केलेले हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

‘कबीर सिंग’ चित्रपटाच्या यशानंतर कियारा फार आनंदी असल्याचे दिसत आहे. अलिकडेच तिने आपला २७वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी तिने बॉलिवूडमधील मित्रमैत्रीणींसाठी एक पार्टी आयोजीत केली होती. दरम्यान कियाराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिने सॅटिन फायब्रिकचा फिश कट प्लेन स्कर्ट आणि त्यावर क्रॉप टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. चाहत्यांना तिचा हा लूक फार आवडला होता. त्यावर तिने अॅक्सेसरीज ऐवजी छोटी बॅग घेतली होती. पण ही छोटी बॅग सर्वांचे आकर्षण झाली. या बॅगची किंमत तब्बल तीन लाख ५० हजार रुपये इतकी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 1:20 pm

Web Title: kiara advani wears mini dress as a top with pants for event it costs rs 30k mppg 94
Next Stories
1 ‘जनतेला आपलं पानिपत झाल्यासारखं वाटलं’; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये गाजलं महाराष्ट्राचं राजकारण
2 रजनीकांतने चक्क चाहत्याचे धरले पाय, कारण…
3 ‘जॉनी डेपने माझ्या वडिलांना दिली ठार मारण्याची धमकी’; अभिनेत्रीने केला आरोप
Just Now!
X