26 February 2021

News Flash

कपिलने गिफ्ट देताच अक्षय म्हणाला, ‘इंडस्ट्रीमधील अर्धे पैसे तर तूच…’

शोच्या आगामी भागाचा प्रोमो कपिल शर्माने शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा.’ शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील चित्रपटांच्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावताना दिसतात. नुकताच कपिल शर्मा शोमध्ये अक्षय कुमारने हजेरी लावली होती. अक्षय कपिल शर्मासोबत मजा मस्ती करताना दिसत आहे. दरम्यान मजेशीर अंदाजात त्याने कपिलला इंडस्ट्रीमधील सगळे पैसे तूच घेऊन जातोस असे म्हटले आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय आणि कियारा अडवाणी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले आहेत. कपिलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शोचा प्रोमो शेअर करत माहिती दिली आहे. हा प्रोमो शेअर करत त्याने ‘या विकेंडला लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी कपिल शर्मा शोमध्ये येणार आहेत’ असे कॅप्शन दिले आहे.

कपिलने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये कपिल आणि अक्षय कुमार मस्ती करताना दिसत आहेत. ‘अक्षय सर आमच्या शोला २५ वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट आणले आहेत’ असे कपिल बोलताना दिसतो. ते गिफ्ट पाहून अक्षय कुमारने दिलेले उत्तर ऐकून सर्वांना हसू अनावर होते.

अक्षय कुमारला नोटा मोजण्याच्या मशिन सारखे एक मशिन गिफ्ट म्हणून देण्यात येते. ते पाहून अक्षय म्हणतो, ‘ही आहे नोटा मोजण्याची मशिन. कपिल त्याच्या घरुन घेऊन आला आहे. कारण इंडस्ट्रीमधले अर्धे पैसे तर तूच घेतोस.’ अक्षयचे हे उत्तर ऐकून सर्वांना हसू अनावर झाले.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या दिवशी हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 4:36 pm

Web Title: kiara akshay in the kapil sharma show avb 95
Next Stories
1 “मिर्झापूर वेब सीरिजवर बंदी घाला”; अभिनेत्याची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी
2 रुपेरी पडद्यावर बहरणार ‘Color फूल’ चित्रपट
3 Video : …अन् ‘पहला नशा’ची आठवण झाली; मुलाचं गाणं ऐकून जतिन पंडित थक्क!
Just Now!
X