बॉलिवूडध्ये ह्रतिक रोशन आणि शाहरूख खान यांच्यापाठोपाठ आता सलमान खानच्या रूपाने नवा सुपरहिरो मिळु शकतो. सलमानच्या ‘किक’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित झाले. या पोस्टरवरून ‘किक’ हा चित्रपट एखाद्या सुपरहिरोच्या कथेवर आधारित असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाच्या गडद हिरव्या रंगाच्या पोस्टरवरील लाल रंगातील सुपरहिरोचा मास्क सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे आता ह्रतिकच्या ‘क्रिश’ आणि शाहरूखच्या ‘जी-वन’ नंतर बॉलीवूडला नवा सुपरहिरो मिळणार का याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे. ‘किक’ चित्रपटात सलमान खानसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि रणदीप हुडा प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील.