News Flash

किम कार्दशियन अडकली वादात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

(Photo Credit : Kim Kardarshian Twitter)

हॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून अभिनेत्री किम कार्दशियनकडे पाहिलं जातं. किम तिच्या अभिनयापेक्षा चित्रविचित्र पेहराव, वादग्रस्त वक्तव्य, लीक होणारे खासगी व्हिडीओ आणि बोल्ड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. यावेळी किमवर हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचे आरोप करण्यात आले आहे.

किमने नुकतेच एक फोटोशूट केले. त्याचे काही फोटो तिने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये किम गुलाबी रंगाच्या बेड वर असल्याचे दिसत आहे. लाल रंगाचा प्रिटेड ड्रेस किमने परिधान केला आहे.  तर त्यासोबत किमने ओम हे धार्मिक चिन्ह कानातले म्हणून घातले आहे. यामुळे किम ट्रोल झाली आहे.

किमचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे किम ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की किमने परिधान केलेले कानातले हे धार्मिक प्रतिक आहे, जे असे परिधान केले जाऊ शकतं नाही. एक नेटकरी म्हणाला, “ओम हिंदूंसाठी एक पवित्र प्रतीक आहे आणि फक्त एक एक्सेसरीसाठी नाही आणि हे सांगण्यासाठी हा चांगला काळ आहे का?” दुसरा नेटकरी म्हणाला, “हे सेलिब्रिटीज सांस्कृतिक प्रतीक वापरणे कधी थांबवतील? हे लाजिरवाणे आहे,” अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी किमला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा?

गेल्या वर्षी २०२० मध्ये, मांग टिका आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून फोटोशूट केल्याने किम कार्दशियन ट्रोल झाली होती. एवढंच नाही तर किम कार्दशियन घटस्फोटाच्या मुद्द्यावरून ही चर्चेत होती. किम आणि अभिनेता कान्ये वेस्ट यांनी १९ फेब्रुवारी २०२० रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना चार मुले आहेत. कान्ये वेस्टने किम कार्दशियनकडून मुलांच्या संयुक्त ताब्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 6:07 pm

Web Title: kim kardarshian wears om earrings photos viral fans troll her on twitter dcp 98
Next Stories
1 ‘मिर्झापूर’च्या बबलू पंडितने अ‍ॅमेझॉन प्राइमकडे केली तक्रार; फॅन्सनी विचारलं, “नेटफ्लिक्सने सांगितलंय का ?”
2 ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमचा आरोग्यमंत्र, संजनासोबत इशा आणि गौरीचा योगा
3 कार्तिक आर्यनला दुसरा झटका, करण जोहरनंतर शाहरुखच्या चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता
Just Now!
X