News Flash

चार वर्षात चौथं ब्रेकअप; डीएनएमुळे या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने सोडलं

अभिनेत्याने सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण, म्हणाला...

‘मोहब्बतें’ या चित्रपटातून नावारुपास आलेली अभिनेत्री किम शर्मा सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नाही. तरी देखील मादक फोटो आणि आपल्या ब्रेकअपमुळे ती काय कायम चर्चेत असते. गेल्या चार वर्षात तिचे चार वेळा ब्रेकअप झाले आहेत. गेल्या काही काळात ती अभिनेता हर्शवर्धन राणेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु काही महिन्यांतच त्याचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपवर आता स्वत: हर्शवर्धन याने प्रतिक्रिया दिली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे, हर्शवर्धनच्या डीएनएमुळे त्यांचं ब्रेकअप झालं असं तो म्हणाला आहे.

अवश्य पाहा – ‘बिहार प्रचारात माझ्यावर बलात्कार झाला असता’; अमिषा पटेलने प्रकाश चंद्रांवर केला आरोप

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धनने किमसोबत झालेल्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “माझ्या डीएनएमुळे आमचं ब्रेकअप झालं. जवळपास १२ वर्ष मी सिंगल होतो. त्यानंतर माझ्या आयुष्यात किम आली. सुरुवातीचा काळ खूप छान होता. परंतु त्यानंतर आमच्यात लहानमोठ्या गोष्टींवरुन मतभेद होऊ लागले. सुरुवातीला मी तिची प्रत्येक गोष्ट मान्य करायचो. कारण वाद घालणं हे माझ्या डीएनएमध्येच नाही. माझ्या याच डीएनएमुळे आमच्या नात्यात दरी निर्माण झाली. अन् एक दिवस आम्ही ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.”

अवश्य पाहा – ‘या अभिनेत्रीला माझ्या मांडीवर बसवायचो; सलमानच्या प्रश्नावर अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

किमने २०१० साली अली पुंजानी नामक एका व्यवसायिकाशी लग्न केलं होतं. परंतु तिचा संसार दिर्घ काळ चालला नाही. चार वर्षांतच तिने अलीला घटस्फोट दिला. त्यानंतर ती अनुक्रमे विजे युडी, अर्जून खन्ना आणि स्पॅनिश गायक कार्लोस मरिन यांच्यासोबत काही काळ रिलेशनशिपमध्ये होती. परंतु सलग तीन वर्षात तिचे तीनदा ब्रेअप झाले. त्यानंतर ती अभिनेता हर्शवर्धन राणेसोबत रिलेशनशिपमध्ये होती परंतु त्यांचं ही नातं दिर्घकाळ टिकलं नाही. शिवाय करिअरच्या सुरुवातीस ती क्रिकेटपटू युवराज सिंहला देखील डेट करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 2:26 pm

Web Title: kim sharma breakup harshvardhan rane mppg 94
Next Stories
1 अरेच्चा हे काय! लग्नात नेहाने केलं ‘या’ अभिनेत्रींना कॉपी?
2 ‘कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा…’, मोहब्बतेमधील ऐश्वर्याबाबत फराह खानने केला खुलासा
3 “इथे केलेला कचरा सोबत घेऊन जा”; गोव्याच्या मंत्र्यांचा करण जोहरला दम
Just Now!
X