23 January 2020

News Flash

Photo : युवराज सिंग व एक्स गर्लफ्रेंड किम शर्माचा फोटो व्हायरल

'फक्त सकारात्मक ऊर्जा,' असं कॅप्शन देत किमने हा फोटो पोस्ट केला आहे.

युवराज सिंग, किम शर्मा

भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीचा तडाखेबाज खेळाडू युवराज सिंगने गेल्या महिन्यात निवृत्ती जाहीर केली होती. युवराजने त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यावेळी त्याची एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा हिनेसुद्धा युवराजला शुभेच्छा दिल्या होत्या. आता किम आणि युवराजचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो निवृत्तीनंतर युवराजने आयोजिक केलेल्या पार्टीमधला आहे.

‘फक्त सकारात्मक ऊर्जा,’ असं कॅप्शन देत किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये किम आणि युवराजसोबत त्याची पत्नी हेजल किचसुद्धा आहे.

View this post on Instagram

Good vibes only #tbt

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

युवराजच्या निवृत्तीनंतर हेजलने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. ‘..आणि या (निवृती)बरोबरच एका पर्वाचा अंत झाला. स्वत:बद्दल अभिमान बाळग आणि आता नव्या अध्यायाला सुरुवात करूया.. लव्ह यू,’ अशा शब्दांत हेजलने त्याला पाठिंबा दर्शवला होता. यावर किम शर्माने कमेंट करत लिहिलं होतं, ‘तुमची जोडी अशीच चमकत राहू दे.’

युवराज आणि किमचं २००७ मध्ये ब्रेकअप झालं होतं. युवराजने २०१६ मध्ये अभिनेत्री हेजल किच हिच्याशी लग्नगाठ बांधली.

First Published on July 19, 2019 1:10 pm

Web Title: kim sharma shares a throwback picture with her ex yuvraj singh ssv 92
Next Stories
1 12 वर्षांनी शिल्पा शेट्टीचं कमबॅक, साकारणार ही भूमिका
2 ‘ससुराल सिमर का’ मालिकेतील बालकलाकाराचा अपघाती मृत्यू
3 ”बिग बॉस’च्या घरात सेक्सशिवाय १०० दिवस कशी राहशील?’
Just Now!
X