News Flash

किम शर्मा- लिएंडर पेस यांच्या रिलेशनवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धन राणेची प्रतिक्रिया, म्हणाला…

हर्षवर्धनला एका मुलाखतीमध्ये किम आणि लिएंडर यांच्या रिलेशनशीपविषयी विचारण्यात आले.

एका मुलाखतीमध्ये हर्षवर्धनने एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा आणि लिएंडर पेस यांच्या रिलेशनशीपवर त्याचे मत मांडले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या अफेअरच्या सध्या चर्चा सुरु आहेत. त्या दोघांचे एकत्र फिरतानाचे गोव्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी किम अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत होती. आता किम आणि लिएंडर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हर्षवर्धनने प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी किमचा एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धन राणेचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच या चित्रपटामुळे हर्षवर्धन देखील चर्चेत आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये हर्षवर्धनने एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा आणि लिएंडर पेस यांच्या रिलेशनशीपवर त्याचे मत मांडले आहे.

आणखी वाचा : ‘तापसीसोबत इंटिमेट सीन शूट करताना…’, हर्षवर्धन राणेने सांगितला अनुभव

हर्षवर्धनने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला, ‘मला किम आणि लिएंडर यांच्या रिलेशनशीप विषयी काही माहिती नाही. पण जर हे खरे असेल तर चांगली गोष्ट आहे. तिने स्वत: तिच्या रिलेशनशीप विषयी सांगितले असते तर चांगले झाले असते.’

किम आणि हर्षवर्धन गेली कित्येक वर्षे त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत होते. त्या पूर्वी किम क्रिकेटपटू यूवराज सिंहला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होत. पण २००७ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. आता किम लिएंडर पेसला डेट करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 10:58 am

Web Title: kim sharmas ex harshvardhan rane comments on her affair with leander paes avb 95
Next Stories
1 घटस्फोटानंतर आमिर आणि किरण रावने लडाखमध्ये केला एकत्र डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 “बिग बी आपला मोठेपणा दाखवा”, अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर मनसेचे पोस्टर
3 १४ वर्षानंतरच्या कमबॅकने शिल्पा शेट्टी उत्साहात, रिलीजच्या अगोदरच ‘हंगामा 2’ ला म्हणाली ‘सुपरहिट’
Just Now!
X