News Flash

किरण खेर यांची करोनाबाधितांसाठी मदत; खासदार स्थानिक विकास निधीतून दिले १ कोटी!

त्या सध्या कॅन्सरशी लढा देत आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांनी करोनाबाधित रुग्णांना मदत करण्याचं ठरवलं आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी करोनाबाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी १ कोटी रुपये दिले आहे.

त्यांनी आपल्या खासदार स्थानिक विकास निधीतून ही रक्कम दिल्याचं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. चंदीगढच्या एका वैद्यकीय संस्थेला त्यांनी ही मदत दिली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

काही युजर्सचं म्हणणं आहे की त्यांनी डोनेट(दान) हा शब्द वापरायला नको होता. कारण हा पैसा त्यांच्या खिशातून जात नाही. त्यानंतर किरण यांनी एक नवीन ट्विट करत याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा- “औषधांमुळे किरण खेर यांना…”; अनुपम खेर यांनी दिली प्रकृतीची माहिती

किरण यांना काही दिवसांपूर्वीच कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर आलं आहे. त्या सध्या उपचार घेत आहेत. त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर त्यांच्या तब्येतीबद्दल त्यांच्या चाहत्यांना माहिती देत असतात.किरण खेर यांच्यावरच्या संकट काळात त्यांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून नुकतंच अभिनेता अनुपम खेर यांनी अमेरिकन टीवी चॅनलचा एनबीसीचा सीरीज न्यू एमस्टरडम या शोसाठी नकार दिला. सध्या ते पत्नी किरण खेर यांच्या तब्बेतीला प्राथमिकता देताना दिसून येत आहेत. अमेरिकेचा शो सोडून त्यांनी पत्नी किरण यांची काळजी घेत त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:43 pm

Web Title: kiran kher donated 1 crore to corona patients vsk 98
Next Stories
1 ट्विंकल खन्नाने दिली आनंदाची बातमी; थेट लंडनहून मागवले १२० ऑक्सिजन सिलेंडर्स
2 “औषधांमुळे किरण खेर यांना…”; अनुपम खेर यांनी दिली प्रकृतीची माहिती
3 सोनू सूदने लॉन्च केली ‘फ्री कोव्हिड हेल्प’ घरबसल्या मिळणार मदत
Just Now!
X