News Flash

कॅन्सरचं निदान झाल्यानंतर किरण खेर यांची पहिली झलक, मुलाला म्हणाल्या ‘लग्न कर’

या व्हिडीओत सिकंदरने किरण खेर यांची प्रकृती आता सुधारत असल्याचं सांगितलं आहे.

(photo- instagramsikandarkher)

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आणि उपचार सुरु झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी किरण खेर यांची पहिली झलक पाहायला मिळालीय. किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेरच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये किरण खेर यांची झलक पाहायला मिळाली. या आधी अनुपम खेर यांनी किरण खेर यांची प्रकृती आता ठीक असल्याचं सांगितलं होतं. मल्टीपल मायलोमा या एका प्रकारच्या कॅन्सरशी त्या लढा देत आहेत.

सिंकदर खेरने शेअर केलेल्या व्हिडीओत किरण खेर यांना पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला. या व्हिडीओत त्या सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्या एका हाताला पट्टी बांधलेली दिसतेय. यात किरण खेर कमकुवत दिसत आहेत. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य मात्र आजही कायम आहे. या व्हिडीओत किरण खेर यांंनी चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनांसाठी त्यांचे आभार मानले आहेत.

हे देखील वाचा: …आणि काजोल तोंडावर पडली!, ‘कुछ कुछ होता है’च्या शूटिंगचा भन्नाट व्हिडीओ काजोलने केला शेअर

मुलाला दिला लग्न करण्याचा सल्ला

लाईव्ह सेशनचाहा व्हिडीओ शेअर करत सिकंदर कॅप्शनमध्ये म्हणाला, “खेर साहेब आणि किरण मॅम. हा छोटासा आणि सुंदर व्हिडीओ, माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्याकडून हॅलो. तुम्ही माझ्या आईसाठी दाखवलेल्या प्रेमासाठी तुमचे आभार” अशा आशयाचं कॅप्शन त्याने दिलंय. या व्हिडीओत सिकंदरने किरण खेर यांची प्रकृती आता सुधारत असल्याचं सांगितलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच किरण खेर मुलाला लग्न करण्याचा सल्ला देत असल्याचं लक्षात येतंय “काही महिन्यात आता तू ४१ वर्षांचा होशील” असं त्या म्हणत आहेत.

हे देखील वाचा:“तो मोफत जेवण पुरवतोय याबद्दल कुणी का लिहित नाही”; टायगर श्रॉफच्या आईने व्यक्त केली नाराजी

या व्हिडीओत अनुपम खेरसुद्धा दिसत आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात अनुपम खेर यांनी एक ट्विट करत किरण खेर यांना कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. जवळपास ६ महिन्यापासून किरण खेर या मल्टीपल मायलोमा या आजाराचा सामना करत आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 5:18 pm

Web Title: kiran kher first appearance in son sikandar kher instagram live section after cancer diagnosis improving health kpw 89
Next Stories
1 ‘उगाच हीरोपंती करु नका’, टायगर-दिशावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांचा इशारा
2 सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष होत असतानाच अंकिता लोखंडेचा सोशल मीडियावरून ब्रेक
3 “सलमान खान दोन पैशाचा माणूस…”; केआरकेचा दबंग खानवर हल्लाबोल
Just Now!
X