News Flash

‘अर्धा तास फोनवर बोललो आणि…’; आमिर खान- किरणची हटके लव्हस्टोरी

आमिर खान- किरण रावची लव्हस्टोरी

बॉलिवूडमधील परफेक्ट जोडी म्हणून अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे पाहिलं जातं. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खऱ्या आयुष्यातदेखील तितकाच परफेक्ट असल्याचं पाहायला मिळतं.त्यामुळेच त्याच्याविषयी आणि त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. त्यामुळेच आज त्याच्या पत्नीच्या म्हणजेच किरण राव हिच्या वाढदिवसानिमित्त या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेऊ.

किरण आणि आमिरची पहिली भेट २००१ मध्ये ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली. याविषयी आमिरने एका मुलाखतीत सांगितलं आहे. माझी आणि किरणची पहिली भेट लगानच्या सेटवर झाली. त्यावेळी ती सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत होती. खरं तर आम्ही दोघंही एकमेकांसाठी अनोळखी होतो. कारण ती फक्त चित्रपटाच्या टीमचा एक भाग होती. त्यानंतर माझा आणि रिनाचा घटस्फोट झाला, याच काळात मी एकदा किरणसोबत फोनवर बोललो होतो. त्यावेळी किरणने मला स्वत: फोन केला होता. तेव्हा जवळपास अर्धा तास मी तिच्याशी बोलत होतो आणि फोनवर बोलताना मला एक जाणवलं की मी तिच्याशी बोलत असताना आनंदी होतो, असं आमिर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, या संभाषणानंतर आमच्या गाठीभेटी वाढल्या आणि आम्ही रिलेशनशीपमध्ये आलो. जवळपास एक-दीड वर्ष आम्ही एकमेकांना डेट केलं आणि मग लग्नाचा निर्णय घेतला.

दरम्यान, आमिर आणि किरणने यांनी २००५ मध्ये लग्नागाठ बांधली असून त्यांना आझाद हा एक लहान मुलगादेखील आहे. सध्या आमिर त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. लवकरच तो लालसिंह चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 12:34 pm

Web Title: kiran rao birthday special personal life love story aamir khan dcp 98 ssj 98
Next Stories
1 Video : कमी बजेटमध्ये मालिकांचं चित्रीकरण कसं होतं?
2 Video : लक्ष्मीकांत बेर्डे की अशोक सराफ? ‘हा’ महेश कोठारे यांचा जवळचा मित्र
3 ‘वेब सीरिजच्या नावाखाली चौकट मोडू नका, अन्यथा…’; जेठालालनं निर्मात्यांना केलं सावध
Just Now!
X