बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर यांचं नाव बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. किरण खेर आज त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अभिनेत्री किरण खेर यांनी त्यांच्या फिल्मी करियरमध्ये एका पेक्षा एक दर्जेदार भूमिका केल्या आहेत. अभिनेत्री किरण खेर त्यांच्या अफलातून अभिनयाने जितक्या रूपेरी पडद्यावर प्रसिद्ध आहेत तितक्यात खेळाच्या मैदानावर सुद्धा आहेत. किरण खेर याआधी एक उत्तम बॅडमिंटन खेळाडू देखील होत्या. इतकंच नव्हे तर अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांच्यासोबत राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळल्या आहेत.

किरण खेर या राजकारणात देखील सक्रिय असतात. चंदीगडमधील भारतीय जनता पक्षाच्या त्या खासदार आहेत. किरण खेर यांच्या बहिण कंवल ठाकुर कौर या अर्जुन पुरस्कार विजेत्या आहेत. किरण खेर यांची दुसरी बहिण शरणजीत कौर शंधू या भारतीय नौसेनामधील एका अधिकारीच्या पत्नी आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kirron Kher (@kirronkhermp)

किरण खेर यांचे दोन विवाह झाले आहेत. किरण खेर यांनी आधी गौतम बेरी यांच्यासोबत विवाह केला होता. ते एक उद्योगपती आहेत. पण लग्नाच्या काही वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण खेर यांनी अनुपम खेर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. किरण खेर यांच्या मुलाचं नाव सिकंदर आहे. तो सुद्धा एक कलाकार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kirron Kher (@kirronkhermp)

किरण खेर यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरवात ‘आसरा प्यार दां’ या चित्रपटातून केली. १९७३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा एक पंजाबी चित्रपट होता. त्यानंतर किरण खेर यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम करायला सुरवात केली. त्यांच्या अभिनयाला अनेक राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरविण्यात आलंय. ‘देवदास’, ‘खामोश पानी’, ‘मैं हूं ना’, ‘वीर-जारा’ आणि ‘रंग दे बसंती’ सारख्या अनेक चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे. किरण खेर एका रिअॅलिटी शोमध्ये एक परिक्षक म्हणून झळकल्या आहेत. किरण खेर यांचा हसमुख चेहरा देखील सर्व प्रेक्षकांना पसंतीस पडला.