‘बिग बॉस’च्या घरात किशोरी शहाणे त्यांच्या जीवनातील दोन सर्वांत महत्त्वपूर्ण व्यक्तींबद्दल बोलताना दिसत आहेत. हे दोन व्यक्ती आहेत दीपक बलराज व बॉबी. वूटवरील ‘अनसीन अनदेखा’च्या नवीन क्लिपमध्ये किशोरीताई आरोह वेलणकरला जॅकी श्रॉफने तिचा जीवनसोबती दीपक बलराजशी कशाप्रकारे भेट घडवून आणली याबाबत सांगताना दिसत आहेत.
किशोरीताई सांगतात, ”दीपक यांनी २२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हफ्ता बंद’मध्ये जॅकी श्रॉफ हिरो होता आणि त्यावेळी मी मराठी चित्रपटात काम करत होते. तेव्हा जॅकीची आणि माझी ओळख महाकाली, होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये झाली. त्याठिकाणी तो शूटिंगला यायचा. तेव्हा आमच्याच मैत्री वाढली. तेव्हा तो म्हणाला की ‘एक डायरेक्टर है उनको मराठी अॅक्ट्रेस चाहिए’. त्यानंतर जॅकीने माझी ओळख दीपक बलराजशी करून दिली.”
”दीपक यांनी मला ‘हफ्ता बंद’ चित्रपटात भूमिका दिली. सेटवर आमची मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर दीपक यांनी मला ‘बॉम्ब ब्लास्ट’ चित्रपटातही कास्ट केलं. पण तेव्हा आमच्या नात्याबद्दल आईवडिलांना समजलं होतं. त्यामुळे परिस्थिती काहीशी गंभीर झाली होती. तेव्हा कुटुंबीयांना खरं काय ते सांगणं भाग होतं. त्यांनीही आमच्या लग्नास होकार दिला,” असं त्या पुढे म्हणाल्या.
किशोरी आणि दीपक बलराज यांना एक मुलगा असून त्याचं नाव बॉबी आहे. बॉबी सध्या मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 29, 2019 7:45 pm