15 December 2019

News Flash

किशोरी शहाणेंनी उलगडला मुलाच्या मॉडेलिंगचा प्रवास

'वाह, क्‍या बात है!’ हॅट्स ऑफ!' असे म्हणत शिव आणि अभिजीतने बॉबीची प्रशंसा केली

किशोरी शहाणे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व चांगलंच गाजत आहे. या पर्वाला सुरुवात होऊन एक महिना झाला असून घरातील सदस्य त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर आहेत. त्यामुळे अनेक वेळा घरातील सदस्य एकमेकांकडे त्यांची मने मोकळी करतात दिसतात. दरम्यान घरात शांत आणि सामंजस्याने प्रत्यके गोष्टीला सामोऱ्या जाणाऱ्या किशोरी शहाणेदेखील त्यांच्या मुलाच्या मॉडेलिंग प्रवासाबद्दल शिव आणि अभिजीतला सांगित असल्याचे ‘अनसीन अनदेखा’च्‍या व्हिडिओमध्ये दिसून आले.

किशोरी यांचा मुलगा बॉबी विज हा एक मॉडेल आहे. परंतु त्याने मॉडेल होण्यासाठी फार मेहनत घेतली असल्याचे किशोरी यांनी सांगितले. ‘गेल्या वर्षी बॉबी मिस्टर ग्लॅड्रॅग्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. त्यास्पर्धेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. स्पर्धेच्या आधी तिन महिने त्याने वर्कआऊट केला, सिक्स पॅक लूक प्राप्त केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरी दोन दिवस आधी त्याला थायरॉइड असल्याचे कळाले. बॉबीला डॉक्टरांनी आराम करण्याची सक्त ताकिद दिली होती. परंतु बॉबीने कोणाचेही न ऐकता त्याचा वर्कआऊट सुरुच ठेवला’ असे किशोरी म्हणाल्या.

‘मिस्टर ग्लॅड्रॅग्स स्पर्धेची अंतिम फेरी महालक्ष्मी रेसकोर्सला आयोजित करण्यात आली होती. दरम्यान स्पर्धेतील लूक ऑफ द इअर, शोचे रनरप यांची घोषणा होत होती. परंतु बॉबीचे नाव कशातच नव्हते. बॉबी थोडा नाराज झाला होता. स्पर्धेच्या शेवटी फर्स्ट रनरप म्हणून बॉबीचे नाव घोषीत करण्यात आले. तेव्हा तो खूप खूश झाला’ असे किशोरी आनंद होऊन म्हणाल्या.

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अभिजीत आणि शिव यांनी बॉबीची प्रशंसा केली आणि ‘वाह, क्‍या बात है!’ हॅट्स ऑफ!’ असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच किशोरी यांना मुलाने बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी दिलेले परफ्युम चोरबाजार टास्क खेळताना गमवावा लागला होता. त्यावेळी त्या खूप दुखी: झाल्याचे दिसत होते.

First Published on July 16, 2019 1:58 pm

Web Title: kishori shahane talks about her son struggle in modeling currier avb 95
Just Now!
X