नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं हे खरंच सुंदर आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार मानतात. अशाच प्रकारे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने देखील तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर एक उपक्रम राबविला होता. ज्यामध्ये ऋताच्या चाहत्यांना तिची आवड-निवड याविषयी जाणून घ्यायला मिळाली.
आपल्या आवडत्या कलाकाराविषयी अधिकची माहिती अथवा आपल्या कलाकाराची आवड-निवड जाणून घ्यायला मिळाली आणि ही माहिती स्वत: कलाकार देत असेल तर त्यांच्यासाठी चाहत्यांसाठी खरोखरंच आनंदाची गोष्ट असते. अभिनय क्षेत्रात व्यस्त असूनही ऋताने वेळात वेळ काढून तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर #GetToKnowHruta या हॅशटॅगसह कॅम्पेन सुरु केली होती. ज्यामध्ये तिने चाहत्यांना तिचे आवडते कलाकार, पदार्थ, चित्रपट, गाणी, छंद ओळखायला सांगितले होते.
आवडते चित्रपट- दिल धडकने दो, पिकू आणि पॅडमॅन
आवडती गाणी- पहला नशा, टिक टिक, तुम साथ हो
ऋताचे छंद- वाचन, नृत्य, ड्रायव्हिंग
आवडते अभिनेते- रणवीर सिंग, रणबीर कपूर, हृतिक रोशन
आवडत्या अभिनेत्री- दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, काजोल
अशाप्रकारे #GetToKnowHruta कॅम्पेनमुळे चाहत्यांना त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीविषयी बरंच काही जाणून घ्यायला मिळाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 5:59 pm