News Flash

इंडियन आयडलच्या एका भागासाठी नेहा कक्कर घेते ‘इतके’ मानधन

नेहा परिक्षक विशाल दादलानी आणि हिमेश रेशमीयापेक्षा जास्त मानधन घेते.

ती 'इंडियन आयडल'मधील इतर परिक्षकांपेक्षा जास्त मानधन घेते

सोनी वाहिनावरील ‘इंडियन आयडल १२’ हा शो सध्या चर्चेत आहे. देशातील अनेक लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या शोच्या मंचावर परफॉर्म करताना दिसतात. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा आदित्य नारायणवर सोपावण्यात आली आहे तर नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमीया हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. पण हेच परिक्षक एका भागासाठी किती मानधन घेतात असा प्रश्न अनेकांना पडतो. आज ६ जून रोजी नेहा कक्करचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया नेहा इंडियन आयडलच्या एका भागासाठी किती मानधन घेते.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार नेहा कक्कर विशाल दादलानी आणि हिमेश रेशमीया यांच्या पेक्षा जास्त मानधन घेते. इंडियन आयडलच्या प्रत्येक भागासाठी नेहा पाच लाख रुपये मानधन घेते. विशाल दादलानी एका भागासाठी साडे चार लाख रुपये मानधन घेतात तर हिमेश रेशमीया चार लाख रुपये मानधन घेतो. परिक्षकांचे इतके मानधन ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल.

आणखी वाचा : जिथे लहानशा खोलीत बालपण घालवलं, त्याच शहरात नेहानं घेतला आलिशान बंगला!

आणखी वाचा : उर्मिला मातोंडकर ते संजय दत्त, ‘या’ कलाकारांनी केले गूपचूप लग्न

नेहा कक्कर ऐवजी इंडियन आयडल १२साठी नीता मोहनची परिक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नेहा कक्करचा मोठा चाहता वर्ग पाहता तिची निवड करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. या शोचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करत आहे. आदित्य प्रत्येक एपिसोडसाठी अडीच लाख रुपये मानधन घेतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 3:46 pm

Web Title: know about neha kakkar indian idol per episode amount avb 95
Next Stories
1 अभिनेत्री नुसरत जहाँच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा! पती निखिल जैन अजूनही अनभिज्ञ?
2 शाहरुखच्या गाडीभोवती लोक गोळा झाले की सुहाना रडायची!
3 “डॉक्टरांना त्रास देऊ नका, तुम्ही त्यांना मारू शकत नाही”, वरुण धवनने व्यक्त केला संताप
Just Now!
X