‘पाताल लोक’मध्ये चाकूची भूमिका साकारणाऱ्या जगजीत संधूचं सर्वत्र कौतुक होतं आहे. प्रसिद्ध पत्रकार संजीव मेहरा यांच्या हत्येच्या कटामध्ये तो सहभागी असल्याचे दाखवण्यात आले आहे. जगजीतने त्याच्या वाटयाला आलेल्या चाकूच्या रोलचं सोनं केलं आहे.

“मी जीव ओतून अभिनय केलाय. त्यामुळे लोकांना माझी भूमिका आवडेल हा विश्वास होता’. पंजाबी सिनेमाबाहेर ही माझी पहिली मोठी भूमिका आहे. विनोदी भूमिकांप्रमाणे मी अन्य भूमिकाही करु शकतो हे मला सिद्ध करायचे होते” असे जगजीतने सांगितले.

‘पाताल लोकमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता. जयदीप अहलावत, नीरज काबी या सहकलाकारांकडून शिकायला मिळाले’ असे त्याने सांगितले. जगजीतने पंजाबीमध्ये अनेक कॉमेडी सिनेमांमध्ये काम केले आहे. विनोदाचे त्याच्याकडे अचूक टायमिंग आहे. ‘कॉमेडी रोलप्रमाणे मी अन्य भूमिकाही करु शकतो हे मला दाखवून द्यायचे होते. अभिनयाची क्षमता दाखवून देण्याचा किडा माझ्यामध्ये होता. पाताल लोकने मला ती संधी दिली’ असे जगजीत म्हणाला.