सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहेत ती म्हणजे रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांची. रानू मंडल यांनी हिमेश रेशमीयाच्या ‘हॅपी हार्ड अँड हिर’ या चित्रपटात गाणे गात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. नेहमी एकदम साध्या लूकमध्ये दिसणाऱ्या रानू मंडलने नुकताच मेकओव्हर केला आहे. त्यांचा हा मेकओव्हर चाहत्यांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी रानू मंडल यांच्यावर मीम्सचा पाऊस पाडला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो हा उत्तर प्रदेशमधील कानपुर येथील एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात त्यांनी डिझायनर ड्रेस परिधान केला असून त्या ड्रेसवर हेवी मेकअप केला असल्याचे पाहायला मिळाले. रानू यांना पाहून त्यांचा मेकअप नेमका कोणी केला आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता रानू यांचा मेकअप संध्या नावाच्या एका महिला मेकअप आर्टिस्टने केला असल्याचे म्हटले जात आहे. या मेकअप आर्टिस्टने रानू यांच्यासोबत रॅम्प वॉक देखील केला आहे.
आणखी वाचा : रानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
रानू यांना त्यांच्या मेकओव्हर फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्याचबरोबर रानू यांच्या मेकअप आर्टिस्टची देखील नेटकऱ्यांनी फिरकी घेलती आहे. एका नेटकऱ्याने तर रानू यांचा मेकअप करणाऱ्या आर्टिस्टला २०२० मध्ये ऑस्कर देण्यात यावा अशी विनंती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी रानू मंडल यांचा फोटो फोटोशॉप केला असल्याचे म्हणत पाठिंबा दिला आहे.
First Published on November 19, 2019 5:08 pm