News Flash

Birthday Special : श्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र

अभिषेकने केला होता खुलासा

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिचे लाखो चाहते आहेत. आज १७ मार्च रोजी श्वेताचा वाढदिवस आहे. कलाकरांपासून ते चाहत्यांनी तिला सोशल मीडिया पोस्टद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेताच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी…

श्वेता ही बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेता आमिर खानची खूम मोठी फॅन होती. याबाबत आमिर खानला जेव्हा कळाले तेव्हा त्याने श्वेताला पत्र लिहिण्यास सुरुवात केल्याचा खुलासा अभिषेकने केला होता.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अभिषेकने बहिण श्वेताशी संबंधीत अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. “जेव्हा सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कूलमध्ये होती. तिने हा चित्रपट व्हीसीआरवर पाहिला होता. त्यांच्या शाळेत चित्रपट पाहण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे तिने चित्रपट ऑडीओ कॅसेटमध्ये रेकॉर्ड करुन घेतला होता आणि ती कॅसेट ती ऐकायची. इतकच नव्हे तर तिने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फ्रेंड लिहिलेली कॅप देखील अभिषेकडे मागितली होती” असे अभिषेक म्हणाला होता.

आणखी वाचा- बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दरम्यान अभिषेकने सांगितले की श्वेता अभिनेता आमिर खानची देखील फॅन होती. जेव्हा आमिर खानला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला. त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा.

अमिताभ बच्चन यांची मुलगी असूनही श्वेता अभिनय किंवा बॉलिवूडपासून दूर का? असा सवाल श्वेताला अनेकदा विचारण्यात आला. मात्र लहानपणापासूनच श्वेताला अभिनय क्षेत्राचे आणि बॉलिवूडचे आकर्षण नव्हते. श्वेता नंदाने अभिनयाचा वारसा पुढे नेला नसला तरी तिने आजोबांचा लेखनाचा वारसा कायम ठेवला आहे. एक उत्तम लेखिका म्हणून ती नावारुपाला आली.बिग बी अमिताभ बच्चन यांनी कायमच श्वेताचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत. कुटुंबातील स्त्रीयांना ते कायम आदर देत असल्याचे दिसून आलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 10:27 am

Web Title: know about shweta bachchan avb 95
Next Stories
1 20 वर्षानंतर ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल; ‘हा’ चिमुकला झळकणार मुख्य भूमिकेत
2 बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
3 ३२ लाखांची घड्याळ, १.७ लाखाचा ड्रेस प्रियांकाच्या ऑस्कर लूकने वेधल सगळ्यांच लक्ष
Just Now!
X