काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना आणि कल्की कोचलीन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचीही चांगलीच पसंती मिळाली. आता तुम्ही म्हणाल एवढ्या वर्षांत आता जिंदगी इतकी पुढे गेली आहे तर या चित्रपटाची आठवण कशाला काढताय? त्यामागे एक विशेष कारण आहे.
पहिलं कारण म्हणजे या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि दुसरं कारण म्हणजे या पाचही कलाकारांच्या खासगी आयुष्यातील ‘लव्हलाइफ’. आता याला योगायोग म्हणा किंवा आणखी काही पण हे पाचही कलाकार खासगी आयुष्यात आपल्या जोडीदारापासून विभक्त झाले आहेत.
कतरिना कैफ-रणबीर कपूर
बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचा ब्रेकअप झाला. गेले काही वर्षे हे दोघे एकमेकांसोबत डेट करत होते. पण अचानक यांच्यात काय घडले कुणास ठाऊक की यांनी वेगळेच होण्याचा निर्णय घेतला.
फरहान अख्तर-अधुना अख्तर
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये झळकलेला अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना अख्तर विभक्त झाले आहेत. १५ वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाले. या दाम्पत्याला दोन मुली असून घटस्फोटानंतर मुलींची जबाबदारी दोघांचीही असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हृतिक रोशन-सुझान खान
फरहान आणि कतरिनापूर्वीच हृतिकला खासगी आयुष्यात मोठा धक्का पोहोचला होता. पत्नी सुझानपासून हृतिकसुद्धा कायदेशीररित्या विभक्त झाला आहे. लग्नाच्या १५ वर्षांनंतर या दोघांनीही एकत्र निर्णय घेत विभक्त होण्याचे ठरविले.
अभय देओल – प्रीती देसाई
अभय देओलचेही त्याची गर्लफ्रेंड प्रीती देसाईसोबत ब्रेकअप झाले आहे. अभय २०११ पासून प्रीतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. मात्र २०१५ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
कल्की कोचलीन-अनुराग कश्यप
कल्की कोचलीनसुद्धा आपल्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. २०११ मध्ये कल्की आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपचे लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतरच २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 15, 2019 2:31 pm