15 December 2017

News Flash

जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

ती अनुरागच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 15, 2017 8:07 PM

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक- अभिनेता अनुराग कश्यप बराच चर्चेत आला आहे. अनुराग कोणा एका चित्रपटामुळे नाही, तर त्याच्या खासगी जीवनामुळे चर्चेत आला आहे. पहिली पत्नी आरती बजाज आणि दुसरी पत्नी कल्की कोचलीनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता अनुराग २३ वर्षीय तरुणीला डेट करत आहे. शुभ्रा शेट्टी असं या तरुणीचं नाव असून अनुरागने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनच शुभ्रासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

शुभ्रासोबतचे हे फोटो पाहता अनुराग आणि तिचं नातं सर्वांसमोर आता स्पष्ट होत आहे. ४४ वर्षीय अनुराग कश्यप सध्या २३ वर्षीय शुभ्रा शेट्टीच्या प्रेमात आहे. शुभ्रा सध्या अनुरागच्या ‘फॅंटम फिल्म्स’मध्येच काम करते. अनुराग आणि तिचे फोटो व्हायरल झाल्यापासूनच शुभ्राबाबत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी अनेकांनीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटचा आधार घेतला आहे. मुख्य म्हणजे या सर्व चर्चांना आलेलं उधाण पाहता शुभ्राने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन काही पोस्ट डिलीट केल्या आहेत.

काही वेबसाइट्सनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शुभ्रा मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयातील विद्यार्थीनी आहे. ती ‘मास कम्युनिकेशन’ची विद्यार्थीनी आहे. तिच्या फेसबुक पोस्ट पाहता दिलखुलास आयुष्य जगण्याकडेच तिचा जास्त कल असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे अनुरागप्रमाणेच शुभ्राही आधुनिक विचारांची असून चौकटीबाहेरचे विचार करण्याला प्राधान्य देते हे स्पष्ट होत आहे. ‘उडता पंजाब’, ‘रमन राघव २.०’ यांसारख्या चित्रपटांना तिचा पाठिंबा पाहता अनुरागप्रमाणेच तीसुद्धा या क्षेत्रात बरीट सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या निर्मितीतही शुभ्राचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जात असून या चित्रपटाच्या अडचणीच्या वेळी तिचा अनुरागला आधार होता अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

वाचा : पोरगी पास होण्याचं सुख काय असतं ते भाऊ कदमला विचारा

We are killing it #Rupalsid

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

Beauty and the Beast .. just to clarify I am the beauty ..

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

shubhra-1

shubhra

दरम्यान, साचेबद्ध चित्रपटात न अडकता नेहमीच विविध विषयांवर भाष्य करणारा अनुराग कश्यप नेहमीच अनेकांच्या आवडीचा दिग्दर्शक ठरला आहे. ‘देव डी’, ‘नो स्मोकिंग’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आणि ‘रमन राघव २.०’ हे त्याचे काही नावाजलेले चित्रपट.

First Published on June 15, 2017 8:02 pm

Web Title: know everything about shubhra shetty details of anurag kashyaps 23 year old girlfriend photos