News Flash

‘अग्गंबाई सासूबाई’मधील प्रज्ञाविषयी तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का?

नकारात्मक भूमिका असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहते.

अभिनेत्री संजीवनी साठे

छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. होळीनिमित्त मालिकेत नवीन वळण आलं आणि सोशल मीडियावर सध्या याच एपिसोडची चर्चा आहे. सोहमच्या बेलगाम वागण्यावर आसावरीने चपराक लगावली आणि नेटकऱ्यांकडून आसावरीच्या या वागण्याचं कौतुक होत आहे. सोहम आणि प्रज्ञामध्ये जे काही शिजतंय ते शुभ्राने पाहिलं आणि तिचा राग अनावर झाला. या मालिकेत प्रज्ञाच्या भूमिकेनंही विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. प्रज्ञा कारखानीस ही नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी साठे चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

संजीवनी मूळची पुण्याची असून मालिकेच्या कामानिमित्त ती सध्या मुंबईत राहत आहे. संजीवनीची ही पहिलीच मराठी मालिका आहे आणि पदार्पणातच तिने चाहत्यांवर छाप सोडली आहे. नकारात्मक भूमिका असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहते आणि हेच तिच्या अभिनयाचं यश आहे. या मालिकेपूर्वी तिने गुजराती नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय. तिचं ‘विरार फास्ट’ हे गुजराती नाटक चांगलंच गाजलं.

आणखी वाचा : आसावरीने बबड्याला कानाखाली मारताच नेटकऱ्यांनी केला जल्लोष 

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीतही बाजी मारत आहे. निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की आणि रवी पटवर्धन यांच्या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. अनोखं कथानक आणि दमदार कलाकार यांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 12:30 pm

Web Title: know more about aggabai sasubai fame pradnya aka sanjivani sathe ssv 92
Next Stories
1 #MeToo मोहिमेला यश; बलात्कारी निर्मात्याला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
2 ‘नागिन 3’फेम या अभिनेत्रीला सायबर क्राइमचा फटका; २७ हजार रुपये झाले गायब
3 रुपेरी पडदासोडून आता माधुरी करणार ‘येथे’ काम?
Just Now!
X