25 March 2019

News Flash

जाणून घ्या ‘तारक मेहता…’ फेम दयाबेनच्या मुलीचं नाव

दिशा वकानीने ३० नोव्हेंबर २०१७ ला मुलीला जन्म दिला

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम दयाबेन अर्थात दिशा वकानीने ३० नोव्हेंबर २०१७ ला मुंबईतील पवई येथे मुलीला जन्म दिला. सध्या ती आपला संपूर्ण वेळ मुलीलाच देत आहे. पण तुम्हाला तिच्या मुलीचे नाव कळले का? स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिशाने आपल्या मुलीचे नाव स्तुती ठेवले आहे.

काही दिवसांपासून दिशा तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या जोर धरत होत्या. तिची मुलगी फार लहान असून सध्या तिला मुलीसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, म्हणून ती मालिकेला कायमचे अलविदा करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी स्पष्ट केले की, ‘दिशाची मुलगी फार लहान आहे. मुलीला दिशाची गरज आहे. दिशासोबत ती मालिकेत कधी परतणार याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. शिवाय दिशाकडूनही मालिका सोडण्याबद्दल काही सांगितले नाही. त्यामुळे इतक्यात दिशा ही मालिका सोडणा असे आपण बोलू शकत नाही.’

दिशाने गरोदरपणात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या चित्रीकरणामध्ये ब्रेक घेतला होता. तेव्हा असे म्हटले जात होते की, मालिकेचे निर्माते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. पण नंतर निर्माते असित मोदीने दिशाच या मालिकेचा हिस्सा असेल असे स्पष्ट केले होते. तिने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शेवटचे चित्रीकरण केले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने टॉप- १० मधील आपले स्थान कधीही हलू दिलेले नाही. दिशाने या मालिकेशिवाय ‘जोधा- अकबर’, ‘देवदास’, ‘लव स्टोरी २०५०’ आणि ‘मंगल पांडे- द रायझिंग’ सिनेमात काम केले.

First Published on March 14, 2018 4:18 pm

Web Title: know name of dayaben disha vakani newborn daughter taarak mehta ka ooltah chashmah