जसजसा उन्हाळा जवळ येत आहे, तसतसं सोशल मीडियावर समर लूक्सची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. वेगवेगळे सेलिब्रिटीज आपले फोटो शेअर करत आहेत, आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. बीचवरचे फोटो शेअर करत आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही आपले बिकीनीमधले फोटो शेअर केले आहेत. आणि या बिकीनीची किंमत तुम्ही ऐकाल तर चकितच व्हाल.
श्रद्धा सध्या बीचवर वेळ घालवत आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. यासाठी तिने खास डिझायनर बिकिनी घातली आहे. मरुन रंगाची वेलवेटच्या कपड्याची ही बिकिनी घातलेले श्रद्धाचे फोटो तिच्या चाहत्यांना फारच आवडत आहेत.
श्रद्धाची स्टायलिस्ट नम्रता दीपक हिने तिच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत जे तिच्या सगळ्या फॅन पेजेसने व्हायरल केले आहेत. या बिकिनीवर तिने मोठ्या गोल्डन रिंग्स कानात घातल्या आहेत आणि केस बनमध्ये बांधले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by N A M R A T A (@namdeepak)

आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण श्रद्धाची ही वेलवेट बिकिनी तब्बल २४, ९५० रुपयांची आहे. यावर तिने मॅचिंग सनग्लासेसही घातले आहेत.
श्रद्धाने आपल्या वाढदिवसादिवशी एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती पाठमोरी उभी होती. चाहत्यांचे आभार मानणाऱ्या या पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत तिने आपले केस मोकळे सोडले होते आणि बीचवरती एका रम्य संध्याकाळी काढलेला हा फोटो होता.श्रद्धा सध्या लव रंजनच्या एका चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित नाही.