02 March 2021

News Flash

जान्हवीला पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहून श्रीदेवी म्हणाल्या होत्या…

'मिस हवाहवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या आठवणी आजही कायम आहेत.

श्रीदेवी, जान्हवी

‘मिस हवाहवाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या आठवणी आजही कायम आहेत. फक्त चित्रपटांच्या माध्यमातूनच नव्हे तर इतरही विविध मार्गांनी ही चिरतरुण अभिनेत्री प्रेक्षकांच्या आणि कपूर कुटुंबियांच्या मनात घर करुन आहे. श्रीदेवी यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. पण, त्या दु:खाने न डगमगता त्यांची मुलगी जान्हवी आणि खुशी यांनी आपल्या वडिलांना आधार दिला आणि आपल्या करिअरच्या वाटांवर त्या दोघीही चालू लागल्या. सध्या जान्हवी ‘धडक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून, श्रीदेवी यांनी या चित्रपटातील जान्हवीचं काम पाहिल्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने याविषयीची माहिती दिली. आपल्या आईच्या जाण्याचं दु:ख आजही आपल्याला सलत असून, त्या दु:खातून सावरणं कठीण असल्याचं तिने स्पष्ट केलं. जान्हवी आणि श्रीदेवी यांच्यामध्ये आई- मुलीपेक्षा मैत्रीचं जास्त खोल नातं होतं. मुख्य म्हणजे चित्रपटांच्या या दुनियेत पदार्पण करतेवेळी श्रीदेवी यांनी तिला बरंच मार्गदर्शनही केलं होतं. जान्हवीच्या पहिल्या चित्रपटाची एक झलकही श्रीदेवी यांनी पाहिली होती, याचा खुलासा तिने या मुलाखतीत केला.

वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं

जान्हवीचा अभिनय पाहिल्यानंतर आपल्या कामाप्रती आणि अभिनयाप्रती अगदी गांभीर्याने विचार करणाऱ्या श्रीदेवी यांनी तिला अभिनयामध्ये आणखी काही सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर श्रीदेवी यांनी जान्हवीच्या मेकअपवर प्रतिक्रिया देत पसरलेल्या मस्काराविषयी टीप्पणी केली. ‘तू असंच काहीही चेहऱ्याला लावू शकत नाहीस’, असं त्यांनी तिला सांगितलं. आपल्या आईकडून मिळालेलं हे मार्गदर्शन जान्हवी कधीच विसरु शकणार नाही. किंबहुना तिच्या संपूर्ण करिअरमध्ये श्रीदेवी यांनी जितकी शिकवण दिली ती सर्व उपयुक्त ठरणार आहे यात वाद नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 10:37 am

Web Title: know what bollywood actress sridevi said after watching janhvi kapoor on screen
Next Stories
1 ..म्हणून मेगन आणि प्रिन्स हॅरी लग्नात आलेल्या कोट्यवधी किंमतीच्या भेटवस्तू करणार परत
2 सोशल मीडियावरील सर्व पोस्ट केले डिलीट; सुशांतला नेमकं झालंय तरी काय?
3 बॉलिवूड कलाकारांपेक्षाही जास्त कमावतात ‘हे’ टेलिव्हिजन सेलिब्रिटी
Just Now!
X