News Flash

अबू सालेमचा फक्त आवाज ऐकूनच प्रेमात पडली होती मोनिका

४ जुलै २००७ मध्ये अबू आणि मोनिकाला एकत्र अटक करण्यात आली

अबू सालेम आणि मोनिका बेदी

मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाकडून शुक्रवारी अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सात जणांना दोषी ठरवण्यात आले. अबू सालेमचे नाव या प्रकरणामुळे जेवढे चर्चेत होते तेवढेच अभिनेत्री मोनिका बेदीमुळेही चर्चेत राहिले होते. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि लवकरच लग्न करणार अशा चर्चाही तेव्हा होत्या. १८ जानेवारी १९४५ ला पंजाबच्या होशियारपुरमध्ये जन्मलेली मोनिका आणि डॉन अबू सालेम यांचे प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय होते.

मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

एक दिवस मोनिकाला दुबईवरुन फोन आला आणि त्या व्यक्तीने सांगितले की तो एक कार्यक्रम आयोजित करत आहे, ज्यात तिनेही सहभागी व्हावे. त्या माणसाने पुढे सांगितले की, सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्यावर तो तिला पुन्हा फोन करेल. दोन ते तीन फोन झाल्यानंतर दुबईवरुन फोन करणाऱ्या व्यक्तिला भेटण्याआधीच ती त्याला पसंत करु लागली होती. ती नेहमीच त्याच्या फोनची वाट बघायची.

१९९८ मध्ये दिग्दर्शक मुकेश दुग्गल यांच्या सुरक्षा या सिनेमातून मोनिकाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. दुग्गल आणि सालेम हे फार जवळचे मित्र होते. दुबईतील एका बॉलिवूड पार्टीत सालेम आणि मोनिका यांची पहिल्यांदा ओळख झाली. तेव्हा तिला माहित नव्हते की तो अबू सालेम आहे. कालांतराने ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. पण त्यांच्यात दुरावा आला. फक्त दुरावाच नाही तर अबू सालेमने मोनिकाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्या नोटीसमध्ये सालेमने ‘मला नवऱ्याचा दर्जा दे नाही तर घटस्फोट दे’ असं स्पष्ट लिहिलं होतं. ४ जुलै २००७ मध्ये अबू आणि मोनिकाला एकत्र अटक करण्यात आली.

मुर्खांनो, तुम्हाला काय कळणार इंग्रजी ऋषी यांचा पाक चाहत्यांना टोला

पाच वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतर मोनिकाने ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर आगमन केले. नंतर २०१५मध्ये ‘बंधन’ या मालिकेतही तिने काम केले होते. आता तीन वर्षांच्या ब्रेकनंतर ती पुन्हा एकदा टिव्ही मालिका करताना दिसणार आहे. मोनिका बेदी लवकरच ‘मासूम’ मालिकेतून नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती फेसबुकवर फार सक्रिय असते. आपल्या नवीन आयुष्याशी निगडीत नवनवीन फोटो आणि व्हिडिओ ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 5:29 pm

Web Title: know what girlfriend of underworld don abu salem monika bedi do in present
Next Stories
1 नाटय़रंग : नातेसंबंध उलगडणारं नाटय़
2 VIDEO : ‘अब इस देश में गांधी के मायने बदल चुके हैं’
3 मूर्ख कुठले, तुम्हाला काय कळणार इंग्रजी!; ऋषी कपूर यांनी पाक चाहत्यांना सुनावले
Just Now!
X