News Flash

पैशांच्या मोबदल्यात कोएनाकडे नाईट-आऊटची मागणी, पोलिसांत तक्रार दाखल

ती व्यक्ती कोएनाशी अश्लिल भाषेत बोलायची

पैशांच्या मोबदल्यात कोएनाकडे नाईट-आऊटची मागणी, पोलिसांत तक्रार दाखल
कोएना मित्रा

आजच्या घडीला अभिनेत्री कोएना मित्रा बॉलिवूडमध्ये कुठेच दिसत नाही. पण तरीही तिचं नुसतं नाव घेतलं तरी तिला कोणीही विसरू शकणार नाही. पण आता असं अचानक काय झालं की कोएना मित्रा पुन्हा चर्चेत आली? त्याचं झालं असं की गेल्या काही दिवसांपासून कोएनाला एक निनावी फोन येत होता. ती व्यक्ती कोएनाशी अश्लिल भाषेत बोलायची. याप्रकरणी तिने मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Secret Superstar new poster: स्वप्नाळू झायरा आणि रॉकस्टार आमिरची झलक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलैपासून त्या अज्ञात व्यक्तीने नाईट- आऊटसाठी कोएनाला फोन करायला सुरूवात केली होती. सुरूवातीला कोएनाने या फोनकडे दुर्लक्ष केले. पण नंतर त्याने कोएनाला नाईट- आऊटला येण्यासाठी पैशांचीही ऑफर दिली. या व्यक्तीने गेल्या काही दिवसांत कोएनाला ५० ते ६० फोन केले आहेत. अखेर कोएनाने पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या या अनोळखी क्रमांकाचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पतीसोबत व्हिडिओ चॅट करताना या मॉडेलने घेतला गळफास

कोएना मित्राने आतापर्यंत अनेक सिनेमांत काम केले असून, ‘मुसाफिर’, ‘हे बेबी’, ‘डार्क रोमान्स’, ‘अपना सपना मनी मनी’ या सिनेमातल्या तिच्या भूमिकांमुळे ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अशा प्रकारचा त्रास सहन करणारी कोएना ही काही एकच अभिनेत्री नाही. याआधी कोएनाप्रमाणेच अनेक अभिनेत्रींना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. यात सोनिका भदौरिया, सोनू वालिसा, अवनी मोदी, श्रुती हासन या नावांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 5:22 pm

Web Title: koena mitra receives lewd call lodges police complaint
Next Stories
1 Secret Superstar new poster: स्वप्नाळू झायरा आणि रॉकस्टार आमिरची झलक
2 भजन रिअॅलिटी शोमध्ये महागुरुपदी दिसणार योगगुरु रामदेव बाबा
3 वाढत्या वजनामुळे ‘साहो’मधून अनुष्काची एक्झिट तर या बॉलिवूड अभिनेत्रीची एण्ट्री
Just Now!
X