News Flash

ब्रेकअपनंतर कधी एक्स बॉयफ्रेण्डला किस केलेस का?

प्रियांका गेल्या आठवड्यात क्वांटिकोच्या सेटवर जखमी झाली होती.

‘कॉफी विथ करण’ चा प्रियांकासोबतचा भाग येत्या २२ जानेवारीला दाखविण्यात येणार असल्याचे म्हटले जातेय.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या आत्मचरित्रपर पुस्तकामुळे. पण, करण आणखी एका कार्यक्रमामुळेही नेहमीच चर्चावर्तुळांमध्ये स्थान मिळवितो. आणि ते कारण म्हणजे त्याचे खुमासदार सूत्रसंचालन. सध्या स्टार वर्ल्ड या वाहिनीवर करणचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चांगलाच गाजत आहे. अनेक बी टाऊन सेलिब्रिटींनी आतापर्यंत या कार्यक्रमात हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. या कार्यक्रमाच्या नुकत्याच चित्रीत झालेल्या भागामध्ये बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

सध्या ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो चांगलाच गाजत आहे. या कार्यक्रमाच्या नुकत्याच चित्रीत झालेल्या भागात प्रियांका चोप्राने देसी तडका लावला. ‘कॉफी विथ करण’ चा प्रियांकासोबतचा भाग येत्या २२ जानेवारीला दाखविण्यात येणार असल्याचे म्हटले जातेय. सदर भाग प्रदर्शित होण्यापूर्वीच या देसी गर्लला विचारण्यात येणारे बोल्ड प्रश्न सध्या चर्चेत आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सेलिब्रिटींना मजेदार टास्क करायला लावणा-या करणने प्रियांकासाठी टकीला शॉटचा टास्क ठेवला होता. या टास्क दरम्यान प्रियांकाला जे प्रश्न विचारले जातील त्याप्रमाणे तिने काही केले असेल तर तिला टकीला शॉट घ्यावा लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, करणने प्रियांकाला बरेच बोल्ड प्रश्न विचारल्याचे कळते. या प्रश्नांपैकी काही प्रश्न असे होते की, ब्रेकअपनंतर तू कधी तुझ्या एक्स बॉयफ्रेण्डला किस केलेस का? पार्टीत गेल्यावर कोणाच्या फॅशन सेन्सवर कधी शेरेबाजी केलीस का? तुला कधी फसवलं गेलंय का? सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेली बॉलीवूडची ही अभिनेत्री या प्रश्नांचे उत्तर तिच्या स्टाईलमध्ये देते की नाही ते हा एपिसोड प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

दरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या आठवड्यात गुरुवारी एबीसी क्वांटिको या मालिकेच्या सेटवर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती आता ठीक असल्याने तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. सेटवर जखमी झाल्यानंतर प्रियांकाने काही दिवस आराम करण्याचा निर्णय घेतल्याचे, सेटवरील सूत्रांनी म्हटले आहे.

क्वांटिको या परेदशी मालिकेत काम करत असलेल्या प्रियांकाला गुरुवारी सेटवर दुखापत झाली. त्यावेळी तिला इजा झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रियांकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात योग्य ते उपचार घेतल्यानंतर तिला आता घरी पाठविण्यात आल्याचे, सेटवरील सूत्रांनी सांगितले. एबीसी क्वांटिकोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीत म्हटले की, न्यू यॉर्कच्या सेटवर एक किरकोळ घटना घडली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या घरीच आहे. तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. प्रियांका जखमी झाली असली तरी त्याचा मालिकेच्या चित्रीकरणावर कोणताही परिणाम झालेला नाही. प्रियांकाशिवाय सध्या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 10:51 am

Web Title: koffee with karan 5 desi girl priyanka chopras confessions about kissing her ex being cheated on might shock you
Next Stories
1 ऋषी कपूरने दाऊदची भेट घेतल्याचा खुलासा
2 सिने ‘नॉलेज’: ‘बॉक्सर’मध्ये मिथुनला कोणी दिली होती फाइट?
3 ‘हरामखोर’साठी नवाजुद्दीनने केवळ १ रुपया घेण्यामागचे कारण..
Just Now!
X