News Flash

Koffee With Karan 6 : सिद्धार्थ मल्होत्राला करायचंय करिनाशी लग्न

सिद्धार्थने सैफविषयीही एक खास वक्तव्य केलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा, करिना कपूर-खान

बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता करण जोहरच्या  ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाची लोकप्रियता केवळ प्रेक्षकांमध्येच नाही. तर कलाकारांमध्येही त्याची क्रेझ आहे. करणच्या या कार्यक्रमामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरील लावली असून करणने अनेक कलाकारांची पोल केली आहे. या शोच्या माध्यमातून करण कलाकारांना चांगलचं बोलतं करतो. त्यांमुळे या शोची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. सध्या या शोचं ६ वं पर्व सुरु असून या पर्वाच्या नव्या भागाचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या भागात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी त्याने करिना कपूरशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सिद्धार्थसोबत आदित्य रॉय कपूरही मंचावर उपस्थित होता. यावेळी करणने एका राऊंडमध्ये सिद्धार्थला काही प्रश्न विचारले. त्यात ‘कलाविश्वातील कोणत्या अभिनेत्रीला तुला पत्नीच्या रुपात पाहायला आवडेल ?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर सिद्धार्थने तात्काळ उत्तर देत अभिनेत्री करिना कपूरचं नाव सांगितलं. त्यामुळे सिद्धार्थ करिना कपूरचा चाहता असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यानंतर अभिनेता सैफ अली खानला भावाच्या रुपात पाहायला आवडेल असंही सिद्धार्थने सांगितलं. त्यामुळे हा शो चांगलाच रंगल्याचं दिसून आलं.

दरम्यान, करणच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये सिद्धार्थ आणि आदित्यने प्रचंड धमाल केली असून त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्ट त्यांनी उघडपणे सांगितल्या आहेत. करणच्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या शोमुळे काही कलाकारांमधील आपसातले वाददेखील मिटले आहेत. तर काही कलाकारांची पोलखोलदेखील झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:14 pm

Web Title: koffee with karan 6 actor sidharth malhotra says he would love to have kareena kapoor khan as his wife
Next Stories
1 ‘उरी’ने ओलांडला २०० कोटींचा टप्पा, उपराष्ट्रपतींनाही आवडला सिनेमा; ट्विट करुन म्हणाले…
2 अभिनेत्री शमिता शेट्टीच्या गाडीला अपघात
3 श्रद्धाने आपल्या १३ वर्षाच्या चाहतीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण
Just Now!
X