17 December 2017

News Flash

करणचे लाखमोलाचे ‘गिफ्ट हॅम्पर’

करण तिखट प्रश्नावलीत पास होणाऱ्याला देत असतो हे गिफ्ट हॅम्पर

ऑनलाइन टीम | Updated: March 20, 2017 6:31 PM

कॉफी विथ करण

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाने फारच कमी काळात चांगली लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण बॉलिवूडमधील कलाकारांसोबत कॉफीच्या बहाण्याने त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपिते बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसला. करणच्या कार्यक्रमामध्ये कलाकारही मनमोकळ्या गप्पा मारत त्यांने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. या कार्यक्रमात रंगत निर्माण करणारा भाग म्हणजे कलाकारांना रॅपिड फायर राऊंडमध्ये विचारले जाणारे प्रश्न. करण या राऊंडमध्ये पाहुण्यांना सलग प्रश्नांचा भडीमार करतो. या कार्यक्रमातील हा भाग फारच मजेशीर असतो. बॉलिवूड कलाकारांसाठी हा राऊंड म्हणजे कठिण परिक्षाच असते. कदाचित म्हणूनच ही परिक्षा पास होणाऱ्याला करणकडून खास बक्षीस दिले जाते.

रॅपिड फायर राऊंडमधील प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर विजेत्याला करणकडून जे खास गिफ्ट हॅम्पर दिले जाते. गिफ्ट हॅम्पर देताना अनेकांनी पाहिले ही असेल मात्र या गिफ्ट हॅम्परमध्ये नक्की असते काय? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. पण, खुद्द करणने गिफ्ट हॅम्परच्या माध्यमातून पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंचा खुलासा केला आहे. करणने दिलेल्या माहितीनुसार, गिफ्ट हॅम्परमध्ये खालील भेटवस्तू विजेत्याला दिल्या जातात. १. ब्राऊनी, २. कॉफीचा मग सोबत हेल्थ बार, ३. लेविटएटिंग ऑरिएंटल स्पीकर, ४. पर्सनलाइज्ड रोस्टेड कॉफी, ५. कॉफी फ्रेंच प्रेस, ६.नॉर्डिक कॅण्डी, ७ क्लेन्सिंग पेस्ट, ८. पाच लाख रुपयांचे एक व्हॉवचर, ९. हेल्थ जार, १०. चॉकलेटस्, ११. शैम्पियन, १२.कुकीज, १३. चीज प्लॅटर अशा गोष्टी असतात. या सर्व वस्तुंचा समावेश असणाऱ्या गिफ्ट हॅम्परची किंमत जवळ जवळ १० लाख रुपये इतकी असते.

काही महिन्यांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या सत्रात विनोदवीर कपिल शर्मानेही हजेरी लावली होती. यावेळी त्याने करणच्या रॅपिड फायरच्या प्रश्नांवलीची झटपट उत्तरे देत गिफ्ट हॅम्पर मिळविले होते. त्यानंतर कपिलने ट्विटवरुन मिळालेल्या गिफ्ट हॅम्परचे फोटो शेअर करत करणचे आभार मानले होते. करणने दिलेले गिफ्ट फारच सुंदर आहे, असा उल्लेख देखील त्याने ट्विटमध्ये केला होता. पण, गिफ्ट हॅम्परमध्ये नक्की कोणत्या सुंदर भेटवस्तू मिळाल्या हे मात्र आतापर्यंत गुपितच होते. पहिल्या सत्रापासून ते सध्या सुरु असणाऱ्या पाचव्या सत्रापर्यंत करणच्या गिफ्ट हॅम्परमध्ये नक्की काय असते, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

First Published on March 20, 2017 6:31 pm

Web Title: koffee with karan hamper includes nordic kandie gift voucher and more gifts