एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा रिमेक दुस-या प्रादेशिक भाषेत होणे हे कौतुकाचं आहे. कारण यामुळे एखादी सुंदर, मनोरंजक आणि वेगळेपण जपणारी कलाकृती अथवा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत होते. मल्याळम भाषेत सुपरहिट ठरलेल्या ‘अंगमली डायरीज’ या चित्रपटाचा मराठी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोल्हापूर डायरीज’ या मराठी रिमेकमध्ये अभिनेता भूषण नानासाहेब पाटील मुख्य भूमिका साकारणार असून त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे.

मूळचा धुळेचा असणारा भूषण पाटील याने १८ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याच दिवशी भूषणला डिजीटल मिडीयावर प्रदर्शित झालेला त्याच्या नव्या चित्रपटातील नवा लूक हे खास सरप्राईज मिळाले. हे सरप्राईज जसे भूषणसाठी खास होते तसेच ते प्रेक्षकांसाठी देखील खास ठरले. भूषणच्या नव्या लूकला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Video : सई ताम्हणकरच्या पहिल्या वेब सीरिजचा टीझर पाहिलात का?

सुपरहिट ठरलेल्या मल्याळम चित्रपटाच्या ‘कोल्हापूर डायरीज’ या मराठी रिमेकमध्ये भूषण प्रमुख भूमिकेत दिसणार असून आता त्याच्या लूकची चर्चा होणार आणि प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढणार हे नक्की.