20 January 2021

News Flash

आनंदाची बातमी! लॉकडाउनच्या काळात चित्रपटांना मिळाली पोस्ट प्रोडक्शनची संमती

चित्रपटांची रखडलेली कामे आता होणार पूर्ण

वाढत्या लॉकडाउनमुळे अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती पूर्णपणे थांबली आहे. परिणामी सिनेसृष्टीला कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांनी सरकारला एक पत्र लिहिले होते. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तामिळनाडूमध्ये चित्रपटांच्या पोस्ट प्रोडक्शनला संमती देण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “लग्न केलं ही बातमी आई-बाबांना सांगायला विसरलो”; अभिनेत्याने सांगितला तो किस्सा

तामिळनाडू सरकारने लॉकडाउनच्या काळात चित्रपट आणि मालिकांच्या पोस्ट प्रोडक्शनला संमती दिली आहे. मात्र यादरम्यान केवळ १५ लोक सेटवर हजर राहू शकतात. या मंडळींना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य असेल. पोस्ट प्रोडक्शनमध्ये चित्रीकरण करता येणार नाही. मात्र चित्रीकरण झाल्यानंतर केले जाणारे स्पेशल इफेक्ट, डबिंग, गाण्यांचे रेकॉर्डिंग, एडिटिंग ही कामे करता येतील.

सर्वाधिक वाचकपसंती – “…म्हणून नैराश्यात जाणं मला परवडणार नाही”; चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तामिळनाडूमधील चित्रपट निर्मात्यांच्या संघटनांनी सरकारकडे चित्रीकरणास संमती द्यावी यासाठी एक पत्र पाठवले होते. चित्रपटांचे काम थांबल्यामुळे दररोज ५०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा या पत्रातमध्ये करण्यात आला होता. या पत्राला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के.पलानीस्वामी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी ११ मे पासून पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु करण्यास संमती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 2:47 pm

Web Title: kollywood producers keen to start post production activities mppg 94
Next Stories
1 Video : स्वप्नांच्या रेशीम धाग्याने विणलेली ‘गोष्ट एका पैठणीची’; टीझर प्रदर्शित
2 जेव्हा १५ वर्षांच्या मुलाने सुष्मितासोबत केले होते गैरवर्तन
3 श्रृतीने वडिल कमल हासनबाबत केला खुलासा, म्हणाली…
Just Now!
X