News Flash

कॅप्टन दिलीप दोंदे आणि अभिनेता जितेंद्र जोशी खेळणार ‘कोण होणार करोडपती’

या आठवड्यात २४ जुलैच्या कर्मवीर विशेष भागात ते हजेरी लावणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’मध्ये गेल्या कर्मवीर विशेष भागात पद्मश्री नाना पाटेकर हॉटसीटवर बसले होते. त्यांनी एकूण २५ लाख रुपये रक्कम जिंकून रंगकलामंच कलाकारांना दिली. या आठवड्यात २४ जुलैच्या कर्मवीर विशेष भागात ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे आणि त्यांच्याबरोबर अवलिया अभिनेता जितेंद्र जोशी हे येणार आहेत. कॅप्टन दोंदे हे रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत आणि ते पहिले भारतीय आहेत ज्यांनी समुद्रातून विश्वभ्रमंती केली आहे. त्यांच्या सागर परिक्रमा या प्रकल्पांतर्गत स्वतः बोट बनवून त्यांनी एकट्याने ही सफर केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी हा एक उत्तम नट, कवी आणि लेखकही आहे. समाजाची जाण असलेला हा कलाकार ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर खेळणार आहे.

हॉटसीटवर कॅप्टन दोंदे यांनी आपल्या सागर परिक्रमेचे अनेक रोमांचक किस्से सांगितले. जितेंद्रनेही आपली एक कविता या वेळी वाचून दाखवली! गप्पा, कविता, ज्ञान आणि समाजाला आपण काहीतरी देण्याची जाण, या सगळ्यांमुळे हा कर्मवीर विशेष भाग फार छान जमून आला आहे.

आणखी वाचा : ‘वडिलांच्या औषधासाठीही पैसे नव्हते’; जुन्या आठवणींनी नाना पाटेकर झाले भावूक

कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता कॅप्टन दोंदे आणि जितेंद्र जोशी नेमकं कोणासाठी खेळणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 6:35 pm

Web Title: kon honar crorepati karmaveer episode jitendra joshi avb 95
Next Stories
1 ब्रा स्ट्रॅप दाखवल्याने ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्री ट्रोल, पतीने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर
2 ‘त्याला पॉर्न इंडस्ट्रीचा राजा बनायचं होतं’, अभिनेत्याने उडवली राज कुंद्राची खिल्ली
3 ‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद रहेगा’; ‘गदर २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Just Now!
X