29 May 2020

News Flash

कोंकणा सेन आणि रणवीर शौरी यांचा घटस्फोट

बॉलीवूड कलाकार कोंकणा सेन आणि रणवीर शौरी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे

बॉलीवूड कलाकार कोंकणा सेनशर्मा आणि रणवीर शौरी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून वैवाहिक नात्यात असणाऱ्या कोंकणा आणि रणवीर या दोघांनी सोमवारी आपापल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली. या दोघांना हारून हा चार वर्षांचा मुलगादेखील आहे.
रणवीर आणि मी दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आम्ही एकमेकांशी असलेले मैत्रीचे नाते आणि आमच्या मुलाच्या पालकत्वाचे नाते जपणार आहोत, असे कोंकणाने ट्विटरवर म्हटले आहे. रणवीरनेही असाच संदेश आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहला आहे.

२००७ मध्ये रणवीर आणि कोंकणाच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात झाली होती. त्यानंतर २०१० मध्ये या दोघांनी विवाह केला होता. बॉलीवूडच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिक्स्ड डबल्स’, ‘आजा नचले’ आणि ‘गौर हरि दास्तान’ या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2015 6:32 pm

Web Title: konkona sen sharma ranvir shorey announce separation
टॅग Entertainment
Next Stories
1 घरच्या शेतात काम करतोय नवाजुद्दीन!
2 राणी मुखर्जी देणार गोड बातमी
3 मुलगी कृष्णाच्या ‘त्या’ फोटोवर जॅकी श्रॉफ म्हणाला..
Just Now!
X