09 August 2020

News Flash

क्रांती रेडकर आणि सुबोध भावे म्हणतात, ‘होऊ दे खर्च’!

अभिनेता किंवा अभिनेत्रींनी पाश्र्वगायन करणे ही बाब आता नवलाईची राहिलेली नाही.

अभिनेता किंवा अभिनेत्रींनी पाश्र्वगायन करणे ही बाब आता नवलाईची राहिलेली नाही. त्यात आता क्रांती रेडकर आणि सुबोध भावे या नावांची भर पडली आहे. ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या आगामी मराठी चित्रपटासाठी या दोघांनीही पाश्र्वगायन केले आहे. चित्रपटाचे प्रमोशनल गाणे त्यांनी गायले असून ‘आता होऊ दे खुश्शाल खर्च’ असे त्याचे शब्द आहेत.
ओम प्रॉडक्शन प्रस्तुत आणि कांचन अधिकारी दिग्दर्शित हा चित्रपट ‘सायबर क्राइम’वर आधारित विनोदी चित्रपट आहे. हे गाणे मंदार चोळकर यांनी लिहिले असून पाश्र्वगायिका वैशाली सामंत यांनी ते संगीतबद्ध केले आहे.
चित्रपटात क्रांती रेडकर, सुबोध भावे यांच्यासह मोहन जोशी, आविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे आणि अन्य कलाकार असून हा चित्रपट येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2016 12:05 am

Web Title: kranti redkar and subodh bhave sing song for marathi movies
Next Stories
1 दुष्काळाचा दाह मांडणारा ‘निवडुंग’!
2 ‘तेरे नाम’मधील ही अभिनेत्री आठवतेयं का?
3 कोण होतास तू, काय झालास तू..
Just Now!
X