लॉकडाउनमुळे मॉल आणि चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. असाच एक चित्रपट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. कृष्णा अॅण्ड हिज लीला नावाचा हा दाक्षिणात्य चित्रपट एक प्रेमकथा असून तो कोणताही पूर्वसूचना न देता निर्मात्यांनी नेटफ्लिक्सवर २५ जून रोजी प्रदर्शित केला आहे. मात्र आता या चित्रपटावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटामधील मुख्य भूमिकेचे नाव कृष्णा असून त्याच्या भोवती चित्रपटाची कथा फिरते.  कृष्णाचे अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध असल्याचे चित्रपटाच्या कथेमध्ये दाखवण्यात आलं असून यापैकी एका मुलीचे नाव राधा असल्याचे दाखवण्यात आलं आहे. यावरुनच आता नेटफ्लिक्सने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. त्यामुळेच आता नेटकऱ्यांनी BoycottNetflix हा हॅशटॅग वापरुन नेटफ्लिक्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

चित्रपटामध्ये कृष्णाची भूमिका सिद्धू जोन्नलगडने साकारली आहे. तर चित्रपटांच्या तीन प्रमुख अभिनेत्रींमध्ये तेलगु चित्रपटांमधील आघाडीच्या अभिनेत्री सीरत कपूर, श्रद्धा श्रीनाथ, शालिनी वाडनिलकट्टा यांचा समावेश आहे. कृष्णा या एका साधारण दिसणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. साधारण दिसत असला तरी आपल्या संवाद कौशल्याने आणि बोलण्याने तरुणींवर प्रभाव पाडण्यात कृष्णा कायमच यशस्वी ठरतो, असं चित्रपटाच्या कथेत दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच कृष्णाचे अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध असतात. अनेक मुलींबरोबर कृष्णाचे शरीरसंबंध असल्याचेही चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या पैकी राधा (शालिनी), सत्या (श्रद्धा) आणि रुक्सार (सीरत) या मुलींबरोबर कृष्णाचे नाते कसे असते आणि त्यामधून कसा गोंधळ उडतो वगैरे अशी या चित्रपटाची कथा आहे.

मात्र या चित्रपटामध्ये हिंदू धर्मातील देवांची नावे प्रमुख भूमिकांना देऊन निर्मात्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप नेटकरी करत आहे. सोमवार (२९ जून २०२०) सकाळपासून ट्विटवरुन या चित्रपटावर नेटफ्लिक्सने बंदी आणावी आणि हिंदूंची माफी मागावी अशी मागणी करणारी अनेक ट्विट व्हायरल झाली आहेत. हजारोच्या संख्येने नेटकऱ्यांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केली आहेत.

१) देवाचं नाव कशाला?

२) हा तर हिंदू विरोध

३) हिंदू फोबिया

४) सरकारनेच बंदी घालावी

५) असा कंटेंट का हवा

६) द्वेष पसरवू नका

७) आता सहन करणार नाही

८) काही ठाऊक नाही देवाबद्दल आणि…

९) हिंदू कधी एकत्र नसतात म्हणून…

१०) कायम

यासंदर्भात अद्याप नेटफ्लिक्सने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र अशाप्रकारे धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरुन नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स आणि लैला या वेबसीरिजही वादात सापडल्या होत्या.