News Flash

ब्रेकअपनंतर कृष्णा श्रॉफने शेअर केला Kiss करतानाच फोटो; एक्स ब्रॉयफ्रेण्ड कमेंट करुन म्हणाला…

नोव्हेंबर महिन्यामध्ये कृष्णा आणि एवनचं ब्रेकअप झालं आणि आता कृष्णाने हा फोटो शेअर केलाय

(फोटो इन्स्ताग्रामवरुन साभार)

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ आणि मुलगी कृष्णा श्रॉफ हे दोघेही मोठ्या पडद्यापासून सध्या दूर असले तरी कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर हे दोघेही भाऊ-बहिणी आपल्या खासगी आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. मात्र याच फोटो आणि व्हिडीओंमुळे ते चाहत्यांमध्ये कायमच चर्चेचा विषय ठरतात. नुकतच कृष्णा आणि बास्केटबॉलपटू असणारा तिचा प्रियकर एवन हायम्स याचं ब्रेकअप झालं. कृष्णा आणि एवन यांनी एकमेकांसोबतच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. हे ब्रेकअप नक्की का झालं याची माहिती समोर आलेली नाही. मात्र नुकताच कृष्णाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती एका व्यक्तीच्या गालाचे चुंबन घेताना दिसत आहे. या फोटोवर कृष्णाचा एक्स बॉयफ्रेण्ड असणाऱ्या एवननेही कमेंट केलीय हे विशेष.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ब्रेकअपनंतर कृष्णाने आपल्या इन्स्ताग्रामवर हा एका व्यक्तीला किस करताना फोटो शेअर केल्याने तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या फोटोमध्ये कृष्णा एका तरुणाच्या गळ्यात हात घालून त्याच्या गालाचे चुंबन घेताना दिसत आहे. या फोटोला कृष्णाने ‘बे टाइम’ अशी कॅप्शन दिली आहे. कृष्णाचा हा फोटो पाहून एवनने या फोटोवर कमेंट केली आहे. “तू खूपच लवकर मुव्ह ऑन केलंय असं नाही का वाटतं”, असं एवानने कमेंटमध्ये म्हटलं आहे. एवानच्या या कमेंटवर त्याच्या एका चहात्याने तुही आता मुव्ह ऑन व्हायला हवं, असं म्हटलं आहे. त्यावर उत्तर देताना एवानने नाही मला घाई नाहीय असं उत्तरही दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)


कृष्णा ज्या व्यक्तीच्या गालावर किस करत आहे ती व्यक्ती तुर्कीमधील प्रसिद्ध शेफ नुसरत गोकसे असं आहे. कृष्णाने नुसरतसोबत काढलेला हा सेल्फी सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. नुसरत हा जगभरामध्ये सॉल्ट बे या नावाने ओळखला जातो. बीफवर मीठ टाकण्याच्या आपल्या अनोख्या शैलीमुळे तो जगभरामध्ये प्रसिद्ध आहे.

नोव्हेंबरमध्ये कृष्णा आणि एवनचं ब्रेकअप झालं. त्यानंतर कृष्णाने आपल्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवरुन एवनसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. तसेच चाहत्यांनाही मला एवनसोबतच्या फोटोमध्ये टॅग करुन नये, असंही कृष्णाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 9:53 am

Web Title: krishna shroff posts pic with bae ex boyfriend eban hyams comments scsg 91
Next Stories
1 KBC : कर्णासंदर्भातील एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने सोडला खेळ; तुम्हाला ठाऊक आहे का उत्तर?
2 भररस्त्यात हट्टाने पेटली प्रियांका; निकला पूर्ण करावी लागली पत्नीची ‘ही’ इच्छा
3 रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीरंग गोडबोले
Just Now!
X