News Flash

टायगर श्रॉफच्या बहिणीने वाढदिवशी शेअर केला बिकिनी फोटो, आई म्हणाली..

जाणून घ्या काय म्हणाली..

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि निर्मात्या आयशा श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. कृष्णा ही भाऊ टायगर श्रॉफ प्रमाणेच फिटनेटच्या बाबतीत जागरुक असल्याचे पाहायला मिळते. कृष्णाने तिच्या वाढदिवशी सोशल मीडियावर बिकिनी परिधान करुन फोटो शेअर केला आहे. या फोटोवर टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटाणीने कमेंट केली आहे. पण कृष्णाच्या आईने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कृष्णाच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

कृष्णा तिचा २८वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवस साजरा करत असताना कृष्णाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काळ्या रंगाची बिकिनी परिधान करुन फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘मी २८ वर्षांची झाले’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

आणखी वाचा- Birthday Special: नम्रता शिरोडकरने ‘या’ कारणासाठी सोडले होते फिल्मी करिअर

सध्या कृष्णाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पण आयशा श्रॉफ यांनी केलेल्या कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी कमेंटमध्ये ‘माझ्या अतिशय सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे’ असे म्हटले आहे. तर टायगरची गर्लफ्रेंड दिशा पटाणीने ‘बॉडी’ असे कमेंटमध्ये म्हटले आहे. तर एली अवराम हिने कृष्णाच्या पोस्टवर कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 2:39 pm

Web Title: krishna shroff shares bikini pic on her birthday avb 95
Next Stories
1 साडेचार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले, काजोलने सांगितल्या लहानपणीच्या आठवणी
2 ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?
3 Birthday Special: नम्रता शिरोडकरने ‘या’ कारणासाठी सोडले होते फिल्मी करिअर
Just Now!
X