14 December 2019

News Flash

सलमानच्या बहिणीचा घटस्फोटीत नवरा करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मन्य केले

‘हाऊसफुल्ल ४’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री क्रिती खरबंदा अभिनेता पुलकित सम्राटला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळात सुरु होत्या. या सर्व चर्चा खऱ्या असल्याचा खुलासा स्वत: क्रितीने केला आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपण पुलकितला डेट करत असल्याची माहिती दिली.

पुलकित आणि क्रिती यांनी ‘वीरे की वेडिंग’ या विनोदीपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये खुप छान मैत्री झाली. त्यानंतर ‘पागलपंती’ या आगामी चित्रपटात दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी खुप वेळ एकत्र व्यतित केला. दोघे एकाच जीममध्ये एकाच ट्रेनरकडे वर्क आउट करायचे. तसेच ते लंडनमध्ये एकाच रेसीडेंशल कॉम्प्लेक्समध्ये राहात होते. त्याचवेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जात आहे.

२०१४ मध्ये पुलकितने सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा सोबत लग्न केले होते. परंतु त्यांचे नाते दिर्घकाळ टिकले नाही. वर्षभरातच त्याने तिला घटस्फोट दिला. त्यावेळी तो अभिनेत्री यामी गौतमला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. आता तो अभिनेत्री क्रिती खरबंदाला डेट करत आहे.

First Published on November 18, 2019 8:01 pm

Web Title: kriti kharbanda dating pulkit samrat mppg 94
Just Now!
X