News Flash

“मला असं खूप वाटतं की तुझ्या त्या शेवटच्या क्षणी…”; क्रिती झाली भावूक

त्या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजूपतच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथे सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तेथे होती. तसेच क्रिर्ती सेनॉन, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, विवेक ओबेरॉय, उदीत नारायण आणि इतर कलाकार तेथे उपस्थित होते. आता क्रितीने सुशांतच्या आठवणीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे.

क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मला असं खूप वाटतं की तुझ्या त्या शेवटच्या क्षणी मदत करणारे लोकं तुझ्याजवळ असते तर हे असे झालेच नसते. ज्या लोकांचे स्वत:वर जास्त प्रेम आहे अशा लोकांना तू का दूर केलं नाहीस. काश मला तुझ्या मनात तुटलेली गोष्ट जोडता आली असती. पण मला असे करता नाही आले. असे म्हटले आहे. तिची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सुशांतच्या निधनानंतर क्रितीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली नसल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते. पण आता क्रितीने एक पोस्ट लिहिली आहे. क्रिती आणि सुशांत हे खूप चांगले मित्र-मैत्रीण होते. तसेच क्रितीची बहिण नुपूर सेनॉनने सोशल मीडियावर पोस्ट करत राग व्यक्त केला आहे.

सुशांत आणि क्रितीने ‘राबता’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. पण या सगळ्या अफवा असल्याचे त्यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 8:31 pm

Web Title: kriti sanon emotional post on sushant singh rajput death avb 95
Next Stories
1 पुन्हा मालिकांचे चित्रीकरण सुरु होण्यावर देवदत्त नागे म्हणतो…
2 आता डॉ. निलेश साबळे म्हणणार ‘लाव रे तो व्हिडिओ’!!!!
3 सुशांतची खिल्ली उडवणं शाहरुख-शाहिदला पडलं भारी; ‘त्या’ व्हिडीओमुळे केलं जातय ट्रोल
Just Now!
X