बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सनॉन हिने अभिनेता टायगर श्रॉफसह हिरोपंती या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. लवकरच ती आता ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान, आपल्याला धूम्रपान करण्याची सवय लागल्याचा खुलासा क्रितीने केला आहे.

क्रितीने तिला सिगारेट ओढण्याची सवय लागल्याचे स्वतः सांगितले आहे. आगामी ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिला ही सवय लागल्याचे तिचे म्हणणे आहे. या चित्रपटात क्रिती एका छोट्या शहरातील मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. यात क्रिती साकारत असलेल्या भूमिकेत ती धुम्रपान करत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. पण, ‘दिलवाले’ चित्रपटात झळलेली ही अभिनेत्री ख-या आयुष्यात धुम्रपानाच्या सवयीपासून चार हात लांबच राहते. मात्र केवळ चित्रपटातील भूमिकेकरिता तिने स्वतःसाठी केलेले नियम मोडत धुम्रपानास सुरुवात केल्याचे म्हटले. याविषयी बोलताना क्रिती म्हणाली की, मी सुरुवातीपासून नॉन स्मोकर राहिले आहे. पण, चित्रपटातील भूमिकेकरिता मी सिगारेट ओढण्याचा निर्णय घेतला. ‘बरेली की बर्फी’ चित्रपटात क्रिती ही एका मिठाईवाल्याच्या कुटुंबातून असल्याचे दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपटाची निर्मिती अश्विनी अय्यर यांची आहे. क्रिती सनॉन व्यतिरीक्त ‘बरेली की बर्फी’ चित्रपटात आयुषमान खुराना आणि राजकुमार राव यांच्याही भूमिका आहेत.

https://www.instagram.com/p/BQMyfkTFayJ/

https://www.instagram.com/p/BQMzSqRl1vr/

‘बरेली की बर्फी’ व्यतिरीक्त क्रिती सनॉन ही ‘राबता’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामुळे ती बरीच चर्चेत आली आहे. चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतसह मुख्य भूमिकेत दिसेल. दरम्यान, क्रिती आणि सुशांतमध्ये प्रेमप्रकरण असल्याच्याही चर्चा सुरु आहेत.

https://www.instagram.com/p/BP-SUKnlV-K/

https://www.instagram.com/p/BQHrbGPllOm/