अभिनेत्री क्रिती सनॉन हिनं नुकतचं एका मासिकासाठी फोटो शूट केलं. या फोटोमुळे क्रिती सोशल मीडियावर टीकेची धनी ठरली आहे. या फोटोशूट दरम्यान कोणत्याही प्राण्याला ईजा पोहोचवण्यात आली नाही अशी सूचना आधीच करण्यात आली होती. मात्र क्रितीचं फोटोशूट अनेकांच्या पसंतीस पडलं नाही.

क्रितीनं इंग्लडमधल्या Aynhoe Park संग्रहालयात फोटोशूट केलं. या ठिकाणी टॅक्सिडर्मी प्रक्रिया करून प्राण्यांच्या मृतदेहाचं जतन करून ठेवण्यात आलं आहे. या प्रक्रियेत जतन करून ठेवलेल्या प्राण्याचे मृतदेह जिवंत असल्यासारखेच भासतात. क्रितीनं या संग्रहालयातील जिराफासोबत फोटोशूट केलं. यावेळी जिराफ हवेत तरंगत असल्यासारखाच भासत होता. त्यामुळे अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे. प्राण्याच्या मृतदेहासोबत फोटो काढणं ही चुकीचं गोष्ट आहे. त्याप्रती आदार दाखवला हवा होता अशी टीका करण्यात येत आहे.

मात्र या फोटोशूटदरम्यान कोणत्याही प्रकारची हानी प्राण्यांना पोहोचवण्यात आली नव्हती असं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. तसेच या जिराफाला फुग्यांचा आधार होता, त्याच्या मृतदेहाची कोणत्याही प्रकारची अवहेलना करण्यात आली नव्हती असंही मासिकानं स्पष्ट केलं आहे.