16 December 2017

News Flash

PHOTO : क्रितीकडून बहिणीला अनोखी ‘बर्थडे गिफ्ट’!

डिस्कोचा लळा सनॉन भगिनींना लागला नाही तर नवलच.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 3:07 PM

लवकरच क्रिती आणि सुशांत सिंग राजपूतचा 'राबता' चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन आणि तिची बहिण नुपूर सनॉन या दोघींमधील जिव्हाळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. क्रितीचे बहिणीवरील प्रेम अनेकवेळा सोशल मीडियावर प्रकट हाताना दिसते. नुपूरला संगीताची आवड असून तिने ही आवड जोपासावी म्हणून क्रिती तिला नेहमीच सहाय करते. बहिणीच्या वाढदिवशी क्रितीने तिला एक गोड आणि अनोखी भेट देऊन आश्चर्याचा सुखद धक्का दिला. क्रितीने दोन महिन्याचे कुत्र्याचे गोंडस पिल्लू दत्तक घेतले असून, लाडकी बहिण नुपूरला ते वाढदिवसाची भेट म्हणून दिले. डिस्को नावाचे हे छोटे पिल्लू अतिशय अल्लड आणि मोहक आहे. अशा या गोंडस डिस्कोचा लळा सनॉन भगिनींना लागला नाही तर नवलच.

लवकरच क्रिती आणि सुशांत सिंग राजपूतचा ‘राबता’ चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीला जोरदार सुरुवात झाली असून, अलिकडेच चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला. त्याचबरोबर सुशांत आणि क्रितीमधील केमिस्ट्रीच्या चर्चादेखील रंगली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअपनंतर सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावण्यापासून ते नव्या कारमधून लाँग ड्राइव्हला जाण्यापर्यंतचे यांचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगणाऱ्या सुशांत आणि क्रितीच्या ‘राबता’ला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. होमी अदजानिया यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ९ जूनला प्रदर्शित होत आहे.

आता अधिक वेळ न दवडता गोंडस डिस्कोची झलक पाहुया. अल्लड डिस्कोच्या करामती पाहून तुमचादेखील काही काळ आनंदात जाईल.

Disco in #Raabta mode! Thats not just a bow..its the infinity sign #Everythingisconnected

A post shared by Kriti (@kritisanon) on

Good morninggg

A post shared by Kriti (@kritisanon) on

How fast is this one growing?! My fur-ball!! #Disco #Happiness

A post shared by Kriti (@kritisanon) on

Not his cup of tea for sure!! #DiscoTheBunny @nupursanon

A post shared by Kriti (@kritisanon) on

A post shared by Kriti (@kritisanon) on

Meet DISCO new and the cutest member of my family!! #munchkin #puppylove

A post shared by Kriti (@kritisanon) on

A post shared by Nupur Sanon (@nupursanon) on

Because this li’l monster is making us dance everywhere in the house!@kritisanon #Disco#cutestbumever

A post shared by Nupur Sanon (@nupursanon) on

First Published on April 21, 2017 3:07 pm

Web Title: kriti sanons cute dog disco