News Flash

वरुण धवनचा आणखी एक फ्लॉप चित्रपट येतोय; अभिनेत्याने उडवली खिल्ली

'स्ट्रीट डान्सर' वरुण धवन आपला आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

वरुण धवनचा आणखी एक फ्लॉप चित्रपट येतोय; अभिनेत्याने उडवली खिल्ली

‘स्ट्रीट डान्सर’ वरुण धवन आपला आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘मिस्टर लेले’ असे आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. परंतु हे पोस्टर पाहून हा चित्रपट सुपरफ्लॉप होणार अशी भविष्यवाणी स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल खान याने केली आहे.

बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला कमाल खान आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने वरुण धवनवर निशाणा साधला आहे. वरुण धवन हा बॉलिवूडमधील सुपरफ्लॉप अभिनेता आहे. त्याने सलग सहा फ्लॉप चित्रपट दिले आहेत. आता तो ‘मिस्टर लेले’ या आणखी एका फ्लॉप चित्रपटासाठी तयार आहे. अशा आशयाचा प्रश्न नेटकऱ्यांना विचारुन त्याने वरुण धवनची खिल्ली उडवली आहे.

केआरकेचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान वरुण धवनच्या चाहत्यांनी कमाल खानवर जोरदार टीका देखील केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 1:10 pm

Web Title: krk challenges varun dhawan mppg 94
Next Stories
1 मोदींनंतर आता रजनीकांत Man Vs Wild मध्ये झळकणार
2 Video : …अन् त्या विषयावर बोलताना दिया मिर्झाला अश्रू अनावर
3 ‘त्या’ व्यक्तीच्या व्हिडीओनं भारावला रितेश ; नेटकऱ्यांकडे मागितला फोन नंबर
Just Now!
X